कोलकात्यात भाड्याने राहणाऱ्या जमात उल मुजाहिदीनच्या ३ बांगलादेशी दहशतवाद्यांना अटक


वृत्तसंस्था

कोलकाता – उत्तर प्रदेशातील काकोरीत ISIS jihad दहशतवाद्यांना अटक करून घातपाताचा मोठा कट उधळल्याच्या दिवशीच पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यात पोलीसांच्या स्पेशल टास्क फोर्सने ३ दहशतवाद्यांना अटक केली. West Bengal: Three suspected Jamaat-ul-Mujahideen Bangladesh (JMB) terrorists arrested by Kolkata Police’s Special Task Force today.

बांगलादेशातील जमात उल मुजाहिदीनचे हे ३ दहशतवादी दक्षिण कोलकात्यातील हरिदेवपूरा भागात भाड्याने खोली घेऊन राहात होते. तेथून ते जिहादी साहित्याचा प्रचार – प्रसार करीत होते. कोलकाता पोलीसांना त्यांच्या जिहादी कारवायांचा सुगावा लागला. छापा घालून तिघांना पकडल्यावर त्यांच्याकडून जिहादी कारवायांची माहिती मिळाली आहे.

त्यांचे फेसबुक अकाऊंट्स, जमात उल मुजाहिदीन संघटनेच्या काही दहशतवाद्यांचे महत्त्वाचे मोबाईल नंबर तसेच हाताने लिहिलेल्या काही डायऱ्या सापडल्या आहेत. या सगळ्यांमध्ये जिहादी तत्त्वांचा प्रचार – प्रसाराचे साहित्य आहे. सोशल मीडियाद्वारे भारतात जिहाद पसरविण्याची ही योजना आहे, असे कोलकात्याचे सह पोलीस आयुक्त सॉलोमन नेसकुमार यांनी सांगितले.

कोलकाता पोलिसांना गुप्तचरांकडून जी टिप मिळाली होती. त्या आधारे आज दुपारी एसटीएफने हरिदेवपूरा भागात छापा घातला. त्या खोलीत हे ३ दहशतवादी झोपले होते. त्यांना ताब्यात घेताच त्यांनी मोठ्या घातपाती कारवायांची माहिती दिली. ते गेल्या काही महिन्यांपासून या खोलीत भाड्याने राहात होते. त्यांना उद्या कोलकाता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी आत्तापर्यंत दिलेल्या माहितीच्या आधारे पुढील पोलीसी कारवाई करण्यात येईल, असे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.

West Bengal: Three suspected Jamaat-ul-Mujahideen Bangladesh (JMB) terrorists arrested by Kolkata Police’s Special Task Force today.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती