west bengal news bjp mla biswajit das joins tmc

पश्चिम बंगालमध्ये भाजपला आणखी एक धक्का, आमदार विश्वजित दास यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

bjp mla biswajit das joins tmc : पश्चिम बंगालमध्ये भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. बगदाचे भाजप आमदार विश्वजित दास आणि नगरसेवक मंतोष नाथ यांनी आज सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश केला. टीएमसीमध्ये सामील झाल्यानंतर, विश्वजित दास म्हणाले की, काही गैरसमजांमुळे काही बदल करण्यात आले होते जे व्हायचे नव्हते. मी आता माझ्या घरी परतलो आहे आणि मी माझ्या राज्यातील आणि मतदारसंघातील लोकांसाठी काम करत राहीन. west bengal news bjp mla biswajit das joins tmc


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. बगदाचे भाजप आमदार विश्वजित दास आणि नगरसेवक मंतोष नाथ यांनी आज सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश केला. टीएमसीमध्ये सामील झाल्यानंतर, विश्वजित दास म्हणाले की, काही गैरसमजांमुळे काही बदल करण्यात आले होते जे व्हायचे नव्हते. मी आता माझ्या घरी परतलो आहे आणि मी माझ्या राज्यातील आणि मतदारसंघातील लोकांसाठी काम करत राहीन.

दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसने ट्वीट करून म्हटले आहे की, “बंगाल ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली विकासाची लाट पाहत आहे. अभूतपूर्व कार्यातून प्रेरित होऊन बगदाहचे भाजप आमदार विश्वजित दास आज टीएमसीमध्ये सामील झाले. टीएमसी नेते पार्थ चॅटर्जी, काकोली घोष दस्तीदार आणि राणी सरकार यावेळी उपस्थित होते. मंतोष नाथ आणि सुब्रत पालदेखील तृणमूल परिवारात सामील झाले. आम्ही सर्वांचे मनापासून स्वागत करतो.”

पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजपला हा तिसरा मोठा धक्का आहे. सोमवारीच बिष्णुपूरचे आमदार तन्मय घोष भाजप सोडून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) सामील झाले. भाजप सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

यापूर्वी, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूलच्या दणदणीत विजयानंतरच मुकुल रॉय टीएमसीमध्ये सामील झाले होते. रॉय सुमारे चार वर्षे भाजपमध्ये होते आणि नंतर ते मायदेशी परतले.

घोष यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी मार्च महिन्यात टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. याआधी घोष बांकुरा जिल्ह्यातील बिष्णुपूर शहराचे टीएमसीचे युवा शाखा अध्यक्ष आणि स्थानिक नागरी संस्थेचे कौन्सिलर होते. घोष यांचे पक्षात स्वागत करताना राज्याचे शिक्षण मंत्री ब्रत्या बसू यांनी दावा केला होता की, भाजपचे अनेक नेते टीएमसीच्या संपर्कात आहेत.

west bengal news bjp mla biswajit das joins tmc

महत्त्वाच्या बातम्या