
वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूर मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. ही पोटनिवडणूक का घ्यावी लागते आहे?, या मुद्द्यावरून बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना जबरदस्त टोला लावला आहे. तुमचा भवानीपुर मतदारसंघ सोडून नंदिग्राम मध्ये यायला काय आम्ही निमंत्रण दिले होते का? कशाला आलात इकडे?? शेवटी जनतेने तुम्हाला पराभूत केलेच ना…??, असा बोचला सवाल सुवेंदू अधिकारी यांनी ममता यांना विचारला आहे. West Bengal CM to come to Nandigram Now if the party asks me to contest from Bhowanipore
West Bengal | Who told you (West Bengal CM) to come to Nandigram? Now, if the party asks me to contest (from Bhowanipore), then what will happen? I defeated her (CM) by 1956 votes: Suvendu Adhikari, BJP leader on by-elections, at Nadia yesterday pic.twitter.com/uXg1EthEhQ
— ANI (@ANI) September 6, 2021
ममता बॅनर्जी यांनी आपला भवानीपूर मतदारसंघ सोडून भाजपमध्ये गेलेल्या सुवेंदू अधिकारी यांना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या नंदिग्राम मधून आव्हान दिले होते.
संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने प्रचंड विजय मिळवूनही खुद्द ममतांना सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात पराभूत व्हावे लागले होते. म्हणूनच आता भवानीपूर मतदारसंघाची पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे.
या पार्श्वभूमीवर सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना टोला लगावला आहे. आता जर
भाजपने मला भवानीपूर मधून लढायला सांगितले तर तुम्हाला काय वाटेल? तुमचा तिथेपण येऊन आम्ही पराभव करू शकतो, असा इशारा सुवेंदू अधिकारी यांनी दिला आहे.
भवानीपूरमधून तगडा उमेदवार देण्याचे भाजपचे मनसूबे आहेतच. त्यात सुवेंदू अधिकारी यांना निवडणूक लढवायला सांगितली तर ममतांसमोर खऱ्या अर्थाने प्रचंड मोठे आव्हान उभे राहू शकते. एकूण भवानीपूरची पोटनिवडणूक ममतांसाठी अजिबात सोपी ठेवायची नाही हा इरादा भाजपने पक्का केलेला दिसतो आहे.
West Bengal CM to come to Nandigram Now if the party asks me to contest from Bhowanipore
महत्त्वाच्या बातम्या
- पवार – वळसे यांच्या कार्यक्रमांना गर्दी; मुख्यमंत्र्यांची तंबी; आता राष्ट्रवादीला गर्दी टाळण्याची उपरती
- पुणे हादरले : गावी जाणाऱ्या 14 वर्षीय मुलीचे अपहरण, 8 जणांनी केला सामूहिक बलात्कार
- थलायवीची वाट पाहत असलेल्या कंगना राणावतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, नेटफ्लिक्सवर ‘या’ दिवशी हिंदीमध्ये प्रदर्शित होणार
- भारतातील दिल्ली, मुंबई ही शहरे सुरक्षित; जगातील सुरक्षित शहरांच्या यादीत समावेश