वृत्तसंस्था
कुचबिहार – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज कुचबिहारच्या सीतालकुचीत सांत्वन दौरा काढला. त्या तेथे हिंसाचारात मरण पावलेल्या चार व्यक्तींच्या नातेवाईकांना भेटल्या आणि निवडणूक संपल्यावर मदतीचे आश्वासन दिले. West Bengal CM Mamata Banerjee met the families of those killed in the Sitalkuchi, Cooch Behar violence
ममता दीदी आम्हाला येऊन भेटल्या. त्यांनी निवडणूक संपल्यावर मदतीचे आश्वासन दिले आहे. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे, असे मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले.
ममता बॅनर्जी यांनी मतदारांना केंद्रीय दलांचा घेराव करा, असे आवाहन केले होते. त्यानंतर सीतालकुचीत मतदानाच्या वेळी जमावाने सीएपीएफ जवानाला घेरून त्याची रायफल खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या हिंसाचारात चार जण ठार झाले होते.
"Didi came to meet us here and said that she would help us as soon as the election ends. She consoled and gave us hope. We trust her," say family members of those killed in Sitalkuchi, Cooch Behar violence pic.twitter.com/o8bEe5TdCr — ANI (@ANI) April 14, 2021
"Didi came to meet us here and said that she would help us as soon as the election ends. She consoled and gave us hope. We trust her," say family members of those killed in Sitalkuchi, Cooch Behar violence pic.twitter.com/o8bEe5TdCr
— ANI (@ANI) April 14, 2021
या मुद्द्यावरून पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचे राजकारण पेटले. सीतालकुचीत जाऊन आपण त्या परिवारांचे सांत्वन करू, असे ममतांनी आधीच जाहीर केले होते. त्यानुसार आज त्या तेथे गेल्या होत्या. मात्र, त्याच दिवशी भाजपच्या एका कार्यकर्त्याची तृणमूळच्या गुंडांनी हत्या केली. त्याच्याविषयी ममतांनी अश्रू ढाळले नाहीत, असे टीकास्त्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोडले होते.
विशेष बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App