विशेष प्रतिनिधी
कोलकाता : भवानीपूर मतदारसंघात महत्त्वपूर्ण पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले आहे. जिथे भाजपच्या प्रियंका टिबरेवाल आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी सुप्रीमो ममता बॅनर्जी यांच्यात लढत झाली. यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे West Bengal by-polls: BJP candidate Priyanka Tibrewal catches a fake voter at a booth in Bhabanipur allegedly planted by TMC
ज्यात मतदान सुरू असताना भवानीपूरच्या खालसा इंग्लिश हायस्कूलमध्ये एका तरुणाला पकडले आहे.ओळखपत्र मागताच या तरूणाने धूम ठोकल्याचे दिसत आहे .हा बनावट मतदार तृणमूल काँग्रेसने पाठवलेला असल्याचा आरोप प्रियांका टिबरेवाल यांनी केला आहे.
False Voter Sent by TMC caught by Priyanka Tibrewal in Khalsa English High School, #Bhabanipur pic.twitter.com/GOQ8oVJnRV — Rishi Bagree (@rishibagree) September 30, 2021
False Voter Sent by TMC caught by Priyanka Tibrewal in Khalsa English High School, #Bhabanipur pic.twitter.com/GOQ8oVJnRV
— Rishi Bagree (@rishibagree) September 30, 2021
प्रियंका यांनी तरुणाला आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी मतदार ओळखपत्र किंवा इतर कोणतेही ओळखपत्र सादर करण्यास सांगीतले . माध्यमांच्या प्रतिनिधिंनी देखील त्या तरुणाला प्रियंका काय सांगत आहे याचे पालन करण्यास सांगितले. त्यांनी त्याला ठावठिकाणा विचारला आणि त्याला आपले मतदार कार्ड दाखवण्यास सांगितले.
प्रियंका यांनी पत्रकारांना माहिती दिली की, तरुण दक्षिण कोलकातामधील निवासी परिसर बांसद्रोणी येथील रहिवासी आहे. मात्रवारंवार विनंती करूनही तरुणांनी लक्ष दिले नाही. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही दिसत नव्हता
. तो त्याच्या आजूबाजूच्या लोकांना सांगत होता की तो एक विद्यार्थी आहे आणि तो बांसद्रोणी येथे राहतो, आणि त्याच्या मतदार कार्डासाठी कॉल करत आहे. तो पुढे म्हणाला की तो आपले मत देण्यासाठी आला होता परंतु त्याला माहित नव्हते की त्याला आपले मतदार ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे.
पोलिस कर्मचारीही त्याच्याभोवती मूक प्रेक्षकांसारखे उभे राहिले . त्यानंतर झालेल्या गोंधळामध्ये तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला.ममता बॅनर्जी यांनी पाठवलेला हा तरुण बनावट मतदार असल्याचा दावा भाजपच्या उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांनी केला आहे. आदल्या दिवशी प्रियांका टिबरेवाल यांनी तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) आमदार मदन मित्रा यांच्यावर ‘बूथ काबीज करण्यासाठी मतदान यंत्र हेतुपुरस्सर बंद केल्याचा आरोप केला होता .
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App