पहिले पाढे 55 : बिहारमध्ये नितीश कुमार – तेजस्वीचा सरकार स्थापनेचा दावा; 164 आमदारांच्या पाठिंब्याचे राज्यपालांना पत्र!!


वृत्तसंस्था

पाटणा : बिहारमध्ये पहिले पाढे 55 या मराठी म्हणीचा प्रत्यय आला आहे संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी एकत्र येऊन 164 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपाल महोदयांना सादर केले आहे हे पत्र सादर करण्यापूर्वी नितीश कुमार यांनी भाजप – संयुक्त जनता दल या संयुक्त सरकारचा राजीनामा सादर केला होता.

राजीनामा सादर केल्यानंतर संयुक्त जनता दल राष्ट्रीय जनता दल आणि अन्य छोट्या पक्षांच्या मिळून आमदारांच्या पाठिंब्यासह नव्या युतीच्या सरकार स्थापनेचा दावा नितेश कुमार आणि तेजस्वी यादव या दोन्ही नेत्यांनी केला आहे. आता या मुद्द्यावर सत्तेतून बाहेर पडावा लागलेला भाजप नेमकी काय भूमिका घेतो राज्यपालांना भेटून स्वतःची काही निवेदन सादर करतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

– जनमत धुडकावल्याची टीका

मात्र पत्रकार परिषदेमध्ये प्रदेशाध्यक्ष संजय पासवान आणि माजी केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली असून त्यांनी जनमताचा आदेश धुडकवण्याचा आरोप केला आहे. 2017 नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर मते मागून भाजप आणि संयुक्त जनता दराने एकत्र काम केले होते. जनमताच्या आदेशानुसार सरकार स्थापन केले होते. पण नितीश कुमार यांनी या जनमताला धुडकावून लावत राष्ट्रीय जनता दलाशी हात मिळवणी केली आहे. बिहारची जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

We have support of seven Mahagathbandhan parties, 164 MLAs in Bihar assembly, says Nitish Kumar

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात