आम्ही “जी हुजूर 23” नाही; कपिल सिब्बल यांनी काँग्रेस हायकमांडला सुनावले


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आम्ही “जी हुजूर 23” नाही, अशा कठोर शब्दांत काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिबल यांनी काँग्रेस हायकमांडला आज सुनावून घेतले.पंजाब मध्ये काँग्रेस समस्येच्या गर्तेत बुडली आहे. राहुल गांधी केरळच्या मल्लापुरम मध्ये लेक्चरबाजी करत हिंडत आहेत, तर कपिल सिब्बल यांनी काँग्रेस हायकमांडला पुन्हा एकदा ठोकून काढले आहे. आजच्या काँग्रेसच्या घडामोडींचा हा आढावा आहे.We are not “Ji Huzur 23”; Kapil Sibal addressed the Congress High Command

पंजाब मध्ये काँग्रेसने कॅप्टन अमरिंदरसिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू या दोघांनाही बाजूला सारून नवी टीम उभी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण त्यामध्ये मोठे अडथळे आले आहेत. बंडखोरीची लाटच पंजाब मध्ये दिसून येत आहे.



दुसरीकडे राहुल गांधी मात्र मल्लापुरम मध्ये “आयडिया ऑफ इंडिया” या विषयावर काँग्रेस कार्यकर्त्यांना लेक्चर देत आहेत. आणि दिल्लीत कपिल सिब्बल यांनी काँग्रेस हायकमांडला पुन्हा एकदा ठोकून काढले आहे.

कपिल सिब्बल म्हणाले, की काँग्रेस हायकमांडला जे जवळचे वाटत होते ते त्यांना सोडून गेले. पण आम्ही पक्षाची विचारसरणी आणि पक्ष सोडून जाणारी माणसे नव्हेत. त्याचबरोबर आम्ही “जी हुजूर 23” पण नाही.

आम्ही आमची मागणी काँग्रेस हायकमांडपुढे सतत मांडत राहणार. काँग्रेस विचारसरणी देशात टिकली पाहिजे आणि वाढली पाहिजे, यासाठी प्रयत्न करत प्रयत्न करत राहणार. पण “जी हुजूरी” करणार नाही, असे कपिल सिब्बल यांनी काँग्रेस हायकमांडला सुनावून घेतले.

We are not “Ji Huzur 23”; Kapil Sibal addressed the Congress High Command

हत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात