वृत्तसंस्था
कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यात 5 जिल्ह्यातील 44 जागांवर मतदान झाले आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 76 टक्के मतदान झालं आहे. दरम्यान, कूचबिहारमध्ये CISF च्या गोळीबारात चार लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे मतदान प्रक्रियेला गालबोट लागले. WB Election 2021 Phase 4 76 per cent polling took place in the fourth phase till 5.30 pm
हावडा जिल्ह्यातील 8 जागांवर, दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील 11 जागा, हुगळी जिल्ह्यातील 11 जागा, अलीपुरद्वारमध्ये 5 जागा आणि कूचबिहार मधील सर्व 9 जागांवर मतदान होत आहे. 44 जागांपैकी 8 जागा दलित, 3 आदिवासी आणि 33 सर्वसाधारण जागा आहेत.
West Bengal Election 2nd Phase : नंदीग्राममध्ये मुस्लिम मतदार निर्णायक, दुसऱ्या टप्प्यात 30 जागांवर असे आहे जातीय समीकरण
बंगालच्या पहिल्या तीन टप्प्यात 91 जागांवर मतदान झाले. चौथ्या टप्प्यात 373 उमेदवार रिंगणात आहेत. मागील वेळी 80.93 टक्के मतदान झाले होते. 2016 च्या निवडणुकीत टीएमसीने 44 पैकी 39 जागा, 2 सीपीएम, 1फॉरवर्ड ब्लॉक, 1 भाजप आणि एका जागेवर काँग्रेसने विजय मिळविला होता.
तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 25 जागांवर टीएमसी तर 19 जागांवर भाजप पुढे होते. चौथ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी 793 सेंट्रल फोर्स तैनात आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 6.30 या वेळेत मतदान झाले.
हे ही वाचा
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App