West Bengal Election 2nd Phase Muslim voters Decide in Nandigram, Know Cast Factor in all Seats

West Bengal Election 2nd Phase : नंदीग्राममध्ये मुस्लिम मतदार निर्णायक, दुसऱ्या टप्प्यात 30 जागांवर असे आहे जातीय समीकरण

West Bengal Election 2nd Phase : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील 30 जागांसाठी 171 उमेदवारांचे भवितव्य गुरुवारी मतदान यंत्रात बंद होणार आहे. या टप्प्यातही राज्यातील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसला भाजपचेच सर्वात कठीण आव्हान असणार आहे. एवढेच नाही, तर याच टप्प्यात ममता बॅनर्जींना स्वतःची नंदीग्रामची टिकवून ठेवण्याचेही आव्हान आहे. बंगालच्या दुसर्‍या टप्प्यात पारंपरिक आणि धार्मिक समीकरणेदेखील खूप महत्त्वपूर्ण मानली जातात, कारण या मतदारसंघांमध्ये 24 टक्के अनुसूचित जातीचे लोक आहेत. यामुळे दलितांची मते मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. West Bengal Election 2nd Phase Muslim voters Decide in Nandigram, Know Cast Factor in all Seats


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील 30 जागांसाठी 171 उमेदवारांचे भवितव्य गुरुवारी मतदान यंत्रात बंद होणार आहे. या टप्प्यातही राज्यातील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसला भाजपचेच सर्वात कठीण आव्हान असणार आहे. एवढेच नाही, तर याच टप्प्यात ममता बॅनर्जींना स्वतःची नंदीग्रामची टिकवून ठेवण्याचेही आव्हान आहे. बंगालच्या दुसर्‍या टप्प्यात पारंपरिक आणि धार्मिक समीकरणेदेखील खूप महत्त्वपूर्ण मानली जातात, कारण या मतदारसंघांमध्ये 24 टक्के अनुसूचित जातीचे लोक आहेत. यामुळे दलितांची मते मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे.

2019 लोकसभेनंतर बदलले मतांचे समीकरण

बंगालच्या दुसर्‍या टप्प्यात 30 जागांमध्ये दक्षिण 24 परगण्यातील चार जागा, पश्चिम मेदिनीपुरात 9 जागा, बांकुरामधील 8 जागा आणि पूर्व मेदिनीपुरातील 9 जागांचा समावेश आहे. 2016च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलने या 30 जागांपैकी 22 जागा जिंकल्या होत्या, परंतु 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. या विधानसभा क्षेत्रांपैकी भाजपला 18 जागा मिळाल्या आहेत, तर टीएमसीला केवळ 12 जागा मिळाल्या आहेत. यामुळेच दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक ही अत्यंत चुरशीची निवडणूक मानली जात आहे.

दुसऱ्या टप्प्यात असे आहे जातीय समीकरण (West Bengal Election 2nd Phase)

बंगालच्या दुसर्‍या टप्प्यात जातीय आणि धार्मिक समीकरण पाहता येथे 24 टक्के अनुसूचित जातीतील मतदारांच्या हातात उमेदवारांचे भविष्य आहे. तर मुस्लिम समुदाय 13 टक्के आहे. याव्यतिरिक्त 5 टक्के अनुसूचित जमातीतील मतदार आहेत. दुसर्‍या टप्प्यातील 30 जागांपैकी 17 जागांवर अनुसूचित जातीतील मतदारांची संख्या 20 टक्क्यांहून अधिक आहे, तर 3 जागांवर अनुसूचित जमातीतील 20 टक्के मतदारांच्या हातात यशाची किल्ली आहे.

नंदीग्राममध्ये मुस्लिम मतदार निर्णायक

जंगल महाल परिसरातील बाउरी आणि बागडी येथे दलित मतदार मोठ्या संख्येने आहेत. तसेच 24 परगणा क्षेत्रात अनुसूचित जमातीच्या 24 उप-जातींचा समावेश आहे. त्याचबरोबर दुसर्‍या टप्प्यात 13 टक्के मुस्लिम असूनही ते नंदीग्राम जागेवर 35 टक्क्यांच्या जवळ आहेत. अशा परिस्थितीत दुसऱ्या टप्प्यात दलितांची मते निर्णायक असली तरी नंदिग्रामच्या जागेवर मुस्लिम मतदारच उमेदवारांची हार-जीत ठरवतील. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानानंतर ममतांना भाजपची धसकी घेतली असून आता दुसऱ्या टप्प्यातील 30 जागांमधील हिंदू मतांना आपल्याकडे वळवण्यासाठी ममतांनी गोत्राचा उल्लेख केल्याचा आरोप विरोधक करताहेत.

दुसर्‍या टप्प्यात बंगालचे जातीय समीकरण पाहता भाजप आणि तृणमूलने सर्व प्रयत्न केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील गंगासागर या तीर्थक्षेत्रांना भेट दिली. हे हिंदूंसाठी महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. गंगासागर भेटीदरम्यान अमित शाह यांनी असे आश्वासन दिले की, भाजपाचे सरकार बनल्यास गंगासागर आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांमध्ये समाविष्ट होईल. भाजपनेही आपल्या जाहीरनाम्यात ही बाब समाविष्ट केली आहे. अमित शहा यांनी काकद्वीप भेटीदरम्यान दलित समुदायातील घरात जेवण केले होते.

ममतांची भिस्त नवीन चेहर्‍यांवर

10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांनी अँटी-इन्कम्बेंसी फॅक्टरशी स्पर्धा करण्यासाठी नवीन चेहरे रिंगणात उतरवले आहेत. तृणमूलने 30 जागांवर 17 नवीन चेहरे लाँच केले आहेत. बांकुरा जिल्ह्यात होणाऱ्या आठ जागांपैकी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने सात उमेदवार बदलले व नव्याने तिकिटे दिली. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात तृणमूलने एकही उमेदवार बदललेला नाही. तेथे 2016च्या विधानसभा निवडणुकीतील जुने चेहरेच कायम ठेवले आहेत.

या टप्प्यात पूर्व मेदिनीपूर आणि पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील 18 जागांवर मतदान होणार आहे. टीएमसीने 18 पैकी 10 उमेदवार बदलले आहेत. ममता बॅनर्जी यांनी स्वत: दुसर्‍या टप्प्यात नंदीग्राम जागेवर जाऊन भाजपचा राजकीय प्रभाव कमी करण्यासाठी डावपेच आखले आहेत. त्यांनी आपल्या प्रचारात महिला मतदारांवर लक्ष केंद्रित केले असून या टप्प्यातील प्रतिस्पर्धी पक्षांपेक्षा जास्त महिला उमेदवारांना त्यांनी तिकिटे दिली आहेत.

ममतांना पहिल्यांदाच विजय कठीण…

ममता बॅनर्जी आपल्या सभांमध्ये ‘द्वारे सरकार’ इत्यादी राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनांचा उल्लेख करताना दिसल्या. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामच्या जागेवर तीन दिवस मुक्काम ठोकला असून येथूनच त्यांनी पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील 18 जागांचे समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे. बांकुरा जिल्ह्यात भाजपचा विजय होण्याची शक्यता आहे, तर दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात तृणमूलची मजबूत स्थिती आहे. पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यात भाजप आणि तृणमूल यांच्या कांटे की टक्कर पाहायला मिळेल. याशिवाय खुद्द ममतांचा गड असलेल्या नंदीग्राममध्ये कमालीची अनिश्चितता असल्याने राजकीय विश्लेषकांचे सर्वात जास्त लक्ष याच जागेकडे आहे.

West Bengal Election 2nd Phase Muslim voters Decide in Nandigram, Know Cast Factor in all Seats

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*