WATCH : ‘ॲड मॅन’ केजरीवालांची जाहिरातींवर दौलतजादा, आरोग्य सुविधांच्या नावाने ठणाणा !

WATCH kejriwal Govenments Shocking Expendiure On Advt, Not A Single Hospital Build Since 7 years Rule

kejriwal Govenments : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे अवघा देश त्रस्त आहे. कोरोना प्रादुर्भाव सर्वात जास्त असलेल्या काही राज्यांपैकी नवी दिल्लीही आहे. देशाची राष्ट्रीय राजधानीलाही इतर राज्यांप्रमाणेच बेड्स, ऑक्सिजन व औषधांच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. परंतु येथील केजरीवाल सरकारने आवश्यक उपाययोजना करण्याऐवजी केवळ जाहिरातबाजीवर जनतेचा पैसा उधळल्याचे एका आरटीआयमधून समोर आले आहे. दिल्लीमध्ये कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे. यादरम्यान गत महिन्यात एका आरटीआयमुळे केजरीवाल सरकारने केलेल्या वायफळ खर्चाचा खुलासा झाला. या आरटीआयनुसार अरविंद केजरीवाल सरकारने यावर्षी जानेवारी ते मार्चपर्यंत विविध माध्यमांतून जाहिरातींवर 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे. त्यांचा एकूण सात वर्षांचा सत्ताकाळ पाहता केजरीवाल सरकारने एकाही नव्या हॉस्पिटलची उभारणी न करता निव्वळ जाहिरातींवर तब्बल 864 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केल्याचे समोर आले आहे. WATCH kejriwal Govenments Shocking Expendiure On Advt, Not A Single Hospital Build Since 7 years Rule

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात