WATCH : ‘व्होट कटवा’ कोणाची कटकट..? समाजवादी पक्षाला ३० मतदारसंघांमध्ये एमआयएमचा फटका बसण्याची दाट शक्यता


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सुमारे शंभर जागा लढविणार असलेल्या एमआयएमचा फटका कोणाला बसेल, याची चर्चा उत्तर प्रदेशात सुरू आहे. बिहारमध्ये नितीशकुमार व भाजपला काठावर बहुमत देण्यामध्ये एका अर्थाने असाउद्दीन औवेसींचीच मदत झाली होती. उत्तर प्रदेशात तसे काही होऊ शकेल काय, असा प्रश्न विचारला जात आहे.’Vote Katva’ MIM may damage SP on 30 seats

बिहारमध्ये असाउद्दीन औवेसींच्या एमआयएमने सुमारे दीड टक्के मते घेतली आणि पाच जागा मिळविल्या होत्या. पण त्यांनी सीमांचल या मुस्लिमबहुल विभागात राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसला चांगलाच दणका दिला होता. परिणामी मुस्लिमबहुल इलाका असतानाही सीमांचलमध्ये नितीशकुमारांच्या पक्षाने बाजी मारली होती. विशेष म्हणजे, इतरत्र नितीशकुमारांच्या संयुक्त जनता दलाचा पराभव होत असताना सीमांचलने त्यांना हात दिला होता.



बहुमतासाठी १२१ जागा असताना नितीशकुमार व भाजपला फक्त ११७च जागा मिळाल्या होत्या, पण छोट्या पक्षांची मदत घेऊन जादुई आकडा गाठला होता. त्यामुळेच औवेसींना व्होट कटवा म्हणून ओळखले जाते.

https://youtu.be/zIrnhmGyBTE

बिहारसारखेच उत्तर प्रदेशात देखील घडू शकते काय, असा सवाल विचारला जात आहे. यूपीतील ४०३ जागांपैकी सुमारे ७० जागा पूर्णपणे मुस्लिमबहुल आहेत. म्हणजे तिथे ३५ टक्क्यांहून अधिक मुस्लिम मते आहेत. ही मते प्रामुख्याने पश्चिम यूपी आणि पूर्वांचलमध्ये केंद्रीत झाली आहेत. औवेसी यांनी याच दोन विभागांवर व मुस्लिमबहुल मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

ते सुमारे १०० जागा लढविणार आहेत. आतापर्यंत त्यांनी ६६ उमेदवारांची घोषणा केली आहे. काही छोट्या पक्षांनाही त्यांनी सोबत घेतले आहेत. त्यांच्या उमेदवारांवर नजर फिरविली तर किमान दहा उमेदवार जिंकण्याच्या थेट शर्यतीत आहेत, तर सुमारे २५ उमेदवार हे दहा ते वीस हजारांदरम्यान मते घेऊ शकतात, असे आकलन राजकीय वर्तुळात आहे.

दुसरया शब्दांत, औवेसी किमान ३० ते ३५ मतदारसंघांवर प्रभाव पाडू शकतात. त्यांचा फटका अखिलेशसिंह यादव यांनाच बसेल, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची अथवा मौलवींची गरज नाही. म्हणूनच आतापर्यंत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात होते, पण अखिलेशसिंह यादवांची डोकेदुखी वाढली आहे.

योगी आदित्यनाथ व अखिलेश यादव यांच्यात काहीच फरक नाही. एक नागनाथ आहे, तर दुसरा सापनाथ. अखिलेश तर असफल नेता आहे, त्यांचे दावे खोटे आहेत. सत्तेवर असताना त्यांनी मुस्लिमांसाठी काय केले? त्यांना फक्त मुस्लिम मतपेढी हवी आहे.

‘Vote Katva’ MIM may damage SP on 30 seats

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात