मणिपूरमध्ये पुन्हा भडकला हिंसाचार; अतिरेकी गटाशी झालेल्या चकमकीत एक कमांडो शहीद, पाच जखमी

मणिपूर पोलिसांना काही अतिरेकी डोंगराळ भागात लपून बसल्याची माहिती मिळाली होती.

विशेष प्रतिनिधी

इंफाळ: मणिपूरच्या ट्रोंगलाबी बिष्णुपूर जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दल आणि संशयित कुकी अतिरेकी यांच्यात चकमक घडली. या हिंसाचारात हिरेन नावाच्या पोलीस कमांडोचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत. Violence again in Manipur One commando martyred five injured in encounter with militant groups

ही घटना इंफाळच्या पुखोन भागात घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमागे अतिरेकी गटाचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूर पोलिसांना काही अतिरेकी डोंगराळ भागात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. हल्लेखोरांना पकडण्यासाठी मणिपूर पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा या भागात पाठवला आहे. मणिपूरमध्ये सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याची ही दुसरी घटना आहे. बुधवारी निमलष्करी दलाच्या एका तुकडीवर झालेल्या गोळीबारात आसाम रायफल्सचा एक जवान जखमी झाल्यानंतर हा हल्ला झाला आहे.

Violence again in Manipur One commando martyred five injured in encounter with militant groups

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात