वृत्तसंस्था
नवी दिल्ली : एकीकडे केंद्र सरकार सरकारी कंपन्यांमध्ये निर्गुंतणूक करीत असताना विजया दशमी मुहूर्त साधत संरक्षण क्षेत्रात मात्र नवी झेप घेताना दिसत आहे. मोदी सरकारने आत्मनिर्भर संरक्षण धोरणानुसार देशातील ऑर्डिनन्स फॅक्टरींच्या कॉर्पोरेटायझेशनमधून 7 नव्या कंपन्या स्थापल्या असून त्यांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या कंपन्यांना 65 हजार कोटींच्या पहिल्या ऑर्डर्स देखील देण्यात आल्या आहेत. Violation of Vijaya Dashami in the field of defense; Establishment of 7 new companies from the corporatization of Ordnance Factory; Orders worth Rs 65,000 crore
देशात ऑर्डिनन्स फॅक्टरींचे जाळे ब्रिटिश काळापासून मजबूत आहे. पण काळाच्या ओघात या फॅक्टरींच्या आधुनिकीकरणाकडे देशाच्या तथाकथित शांतता धोरणामुळे पुरेसे लक्ष देण्यात आले नाही. संरक्षण मंत्रालयाने अधिकृत पत्रकाद्वारे हे जाहीर केले आहे.
आता केंद्रातील मोदी सरकारने आत्मनिर्भर भारताच्या नव्या धोरणानुसार या ऑर्डिनन्स फॅक्टरींमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणून तेथे सैन्य दलांच्या नव्या गरजांनुसार सामग्री निर्माण करण्याची योजना आखली आहे. तिची अंमलबजावणी देखील सुरू केली आहे.
या आत्मनिर्भर धोरणानुसार ऑर्डिनन्स फॅक्टरींच्या येत्या १५ ऑक्टोबरला विजया दशमीच्या मुहूर्तावर ७ नव्या कंपन्या स्थापन करण्यात येतील. त्यांना आधीच संरक्षण दलांच्या पायदळ, हवाई दल आणि नौदल या तीनही विंग्जने आधीच ६५ हजार कोटींची संरक्षण सामग्री तयार करण्याच्या ऑर्डर्स दिल्याच आहेत.
PM Modi to dedicate 7 new defence companies to nation today Read @ANI Story | https://t.co/1XVIU8PjBg#PMModi pic.twitter.com/yMx6TonLaR — ANI Digital (@ani_digital) October 15, 2021
PM Modi to dedicate 7 new defence companies to nation today
Read @ANI Story | https://t.co/1XVIU8PjBg#PMModi pic.twitter.com/yMx6TonLaR
— ANI Digital (@ani_digital) October 15, 2021
विजया दशमीला प्रत्यक्ष या कंपन्या स्थापन करून सामग्री बनविण्याचा मुहूर्त देखील करण्यात येईल. यातून संरक्षण उत्पादने भारतात तयार होऊन ती आपल्या सैन्य दलांना उपयोगी ठरतीलच पण या कंपन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादने तयार होऊन त्यांची निर्यात देखील करता येऊ शकेल, असे सांगण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App