Vinesh Phogat temporarily suspended : भारतीय कुस्ती महासंघाने मंगळवारी स्टार कुस्तीपटू विनेश फोगटला तात्पुरते निलंबित केले आहे. तिच्यावर टोकियो ऑलिम्पिकदरम्यान शिस्तभंगाचा आरोप आहे. विनेश व्यतिरिक्त सोनम मलिकलाही नोटीस बजावण्यात आली आहे. दोन्ही पैलवान टोकियो ऑलिम्पिकमध्ये फारशी चमक दाखवू शकल्या नाहीत. The Wrestling Federation of India temporarily suspended star Vinesh Phogat for indiscipline
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाने मंगळवारी स्टार कुस्तीपटू विनेश फोगटला तात्पुरते निलंबित केले आहे. तिच्यावर टोकियो ऑलिम्पिकदरम्यान शिस्तभंगाचा आरोप आहे. विनेश व्यतिरिक्त सोनम मलिकलाही नोटीस बजावण्यात आली आहे. दोन्ही पैलवान टोकियो ऑलिम्पिकमध्ये फारशी चमक दाखवू शकल्या नाहीत.
विनेश फोगटला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाची मोठी दावेदार मानले जात होते, पण तिची कामगिरी निराशाजनक होती. ती उपांत्यपूर्व फेरीतच बाद झाली. महिलांच्या 53 किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीतील अव्वल कुस्तीपटू विनेश फोगटचा पराभव झाला. विनेशला बेलारूसची कुस्तीपटू व्हेनेसा कलाडझिंस्काया हिने पराभूत केले.
डब्ल्यूएफआयने विनेश फोगटला नोटीसला 16 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. विनेश फोगाट टोकियो ऑलिम्पिकपूर्वी हंगेरीमध्ये प्रशिक्षण घेत होती आणि तेथून थेट टोकियोला गेली. टोकियो गाठल्यावर विनेशने बाकीच्या खेळाडूंप्रमाणे स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये राहण्यास आणि उर्वरित पैलवानांसोबत सराव करण्यास नकार दिला. यादरम्यान विनेशसोबत तिचे प्रशिक्षक वोलार अकोसदेखील होते.
Vinesh Phogat temporarily suspended by The Wrestling Federation of India for indiscipline
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App