शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी उतरले वरुण गांधी, ते तर आमच्या रक्तमांसाचे म्हणत केंद्र सरकारवर साधला निशाणा


विशेष प्रतिनिधी

नवीी दिल्ली : भाजपा सरकारने केलेल्या नव्या कृषि कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता भाजपाचे पिलभितचे खासदार वरुण गांधी यांनीही पाठिंबा दिला आहे. हे शेतकरी आमच्या रक्तमांसाचे असल्याचे म्हणत त्यांची वेदना समजून घेत सरकारने त्यांच्याशी सन्मानपूर्वक चर्चाच सुरू करावी असे म्हटले आहे.Varun Gandhi came out in support of the farmers, he targeted the central government saying they are our flesh and blood

मुझ्झफरपूर येथे होत असलेल्या शेतकरी महापंचायतीच्या पार्श्वभूमीवर वरुण गांधी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कृषि कायद्यांना विरोध करणारे शेतकरी आमच्या रक्तमांसाचे आहेत. त्यांची वेदना समजून घेऊन सरकारने आदरपूर्वक चर्चा सुरू करायला हवी.केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळाले नसल्याने वरुण गांधी नाराज आहेत. त्याचबरोबर उत्तर प्रदेशात होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे. भाजपामधील काही घटक शेतकरी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी सकारात्मक असल्याचे समोर आले आहे.

वरुण गांधी हे पिलीभीत या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. उत्तर प्रदेशातील तराई भागात असलेल्या या मतदारसंघात पंजाबी वंशाच्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर वरुण गांधी यांचे आजोळही पंजाबी आहे. शेतकरी आंदोलनात उत्तर प्रदेश अणि उत्तराखंडातील पंजाबी वंशाचे शेतकरी आघाडीवर आहेत. दिल्लीच्या आंदोलनामध्ये जखमी झाल्यानंतर मृत्युमुखी पडलेले आंदोलक नवनीत सिंग हे देखील उत्तराखंडमधील तराई भागातील होते.

त्यामुळेच आपल्या मतदारसंघातील मतांची चिंता असल्याने वरुण गांधी शेतकऱ्यां च्या आंदोलनाच्या समर्थनार्थ उतरले आहेत.वरुण गांधी यांच्या ट्विटनंतर खुर्जा येथील भाजप आमदार विजेंद्र सिंह यांनी ट्विट केले की गांधींनी शेतकरी आणि देशद्रोही घटक यांच्यात फरक केला पाहिजे.

भाजपाच्या दोन्ही नेत्यांना उत्तर देताना राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनी वरुण गांधी यांचे स्वागत केले आहे. विजेंद्र सिंह यांनी त्यांच्या डोळ्यांची तपासणी करावी किंवा मतदारसंघातील शेतकऱ्यांची भेट घेऊन भावना समजावून घ्याव्यात, असे म्हटले आहे.

Varun Gandhi came out in support of the farmers, he targeted the central government saying they are our flesh and blood

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण