देहराडून-दिल्ली दरम्यान २८ मे पासून धावणार ‘वंदे भारत ट्रेन’


आठवड्यातून सहा दिवस धावणार;  पंतप्रधान मोदी उद्या दाखवणार हिरवा झेंडा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील देहराडून आणि दिल्ली दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची ट्रायल रन मंगळवारी यशस्वी झाली. आता गुरुवारी (२५ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ११ वाजता देहराडून-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला ऑनलाईन माध्यमातून हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार आहेत. Vande Bharat Train to run between Dehradun Delhi from May 28

यानंतर २८ मे पासून देहराडून-दिल्ली वंदे भारत ट्रेन नियमितपणे धावण्यास सुरुवात होईल. ही ट्रेन चालवल्याने देहराडून ते दिल्ली प्रवासाचा वेळ आणखी कमी होईल. वंदे भारत ट्रेन देहराडून ते दिल्ली हे अंतर चार तास ४५ मिनिटांत पूर्ण करेल.

ही ट्रेन देहराडूनहून सकाळी ७ वाजता निघेल आणि सकाळी ११.४५ वाजता आनंद विहार रेल्वे स्थानकावर पोहोचेल. वंदे भारत ट्रेन बुधवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. वंदे भारत ट्रेनला देहराडून ते दिल्ली दरम्यान फक्त पाच थांबे असतील. यामध्ये हरिद्वार, रुरकी, सहारनपूर, मुझफ्फरनगर आणि मेरठचा समावेश आहे.

Vande Bharat Train to run between Dehradun Delhi from May 28

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात