पंजाबात व्हॅक्सिन घोटाळा!, कोव्हॅक्सिन 400 रुपयांना घेऊन खासगी रुग्णालयांना 1060 रुपयांना विक्री केल्याचा आरोप

Vaccine scam in Punjab, Covaxin sold for Rs 400 to private hospitals for Rs 1060

Vaccine scam in Punjab :  कोरोना महामारीला रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरू आहे. केंद्र सरकारने लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत सर्व राज्यांना मोफत लसीचा पुरवठा केला. यानंतरही केंद्राकडून सर्व राज्यांना मोफत पुरवठाच सुरू आहे. दरम्यान, पंजाबात मात्र लसींचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप अकाली दलाने केला आहे. पंजाब सरकारने कोव्हॅक्सिन 400 रुपयांना घेऊन खासगी रुग्णालयांना 1096 रुपयांना विकल्याचा आरोप होत आहे. Vaccine scam in Punjab, Covaxin sold for Rs 400 to private hospitals for Rs 1060


विशेष प्रतिनिधी

चंदिगड : कोरोना महामारीला रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरू आहे. केंद्र सरकारने लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत सर्व राज्यांना मोफत लसीचा पुरवठा केला. यानंतरही केंद्राकडून सर्व राज्यांना मोफत पुरवठाच सुरू आहे. दरम्यान, पंजाबात मात्र लसींचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप अकाली दलाने केला आहे. पंजाब सरकारने कोव्हॅक्सिन 400 रुपयांना घेऊन खासगी रुग्णालयांना 1096 रुपयांना विकल्याचा आरोप होत आहे.

काय आहे प्रकरण?

शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांनी गुरुवारी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस सरकार कोरोनाची लस खासगी रुग्णालयांना ‘जास्त दराने’ विकत असल्याचा आरोप अकाली दलाचे प्रमुख बादल यांनी केला आहे. ते म्हणाले की कोव्हॅक्सिनची एक लस खासगी रुग्णालयांना 1,060 रुपयांना विकली जात आहे.

सुखबीरसिंग बादल यांनी आपल्या एका निवेदनात म्हटले की, कोरोनाची लस सध्या पंजाबमध्ये उपलब्ध आहे, पण सरकार ती खासगी रुग्णालयांना विकत आहे. ते म्हणाले की, पंजाब सरकार 400 रुपयांना लस घेत आहे पण ते खासगी रुग्णालयांना 1060 रुपयांना विकत आहेत आणि खासगी रुग्णालये लोकांना जास्त दराने लस देत आहेत. ही लस राज्यातील खासगी रुग्णालयात 1560 रुपयांपर्यंत दिली जात आहे. एकट्या मोहालीमध्ये एका दिवसात सुमारे 35,000 डोस खासगी संस्थांना विकल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला.

मुख्य सचिवांची संशयास्पद भूमिका!

या सर्व प्रकरणात पंजाबच्या मुख्य सचिव विनी महाजन यांच्या भूमिकेकडे संशयाने पाहिले जात आहे. विनी महाजन यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यालयातही काम पाहिलेले आहे. त्यांची कोळसा घोटाळ्याप्रकरणी सीबीआय चौकशीही झालेली आहे. विनी महाजन यांचे पती दिनकर गुप्ता हे पंजाबचे डीजीपी आहेत.
दोन आठवड्यांपूर्वीच केंद्राने पंजाबात पीएम केअर्समधून दिलेले व्हेंटिलेटर्स धूळखात पडल्याने ते परत देण्याची बोलणी मुख्य सचिवांना केली होती. आता या घोटाळ्याप्रकरणी केंद्र सरकार आता लक्ष घालत आहे. जर हे खरे असेल तर लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 मे रोजी केंद्राच्या लसींची खरेदी व विक्रीसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन ठरेल.

जावडेकरांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

दुसरीकडे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी शुक्रवारी म्हटले की, राहुल गांधींनी इतरांना भाषण देण्यापूर्वी आपल्या राज्याकडे (कॉंग्रेस) पाहिले पाहिजे. ते म्हणाले की, कोरोना लसीच्या 1.40 लाखाहून अधिक डोस पंजाब सरकारला प्रति डोस 400 रुपये दराने देण्यात आले. पण तेथील सरकारने 20 खासगी रुग्णालयांना ही लस एका डोसवर एक हजार रुपयांना विकली. केंद्रीय मंत्री म्हणाले की, आतापर्यंत केंद्र सरकारने राज्यांना 22 कोटी लस विनामूल्य दिल्या आहेत. त्यांनी (पंजाब सरकारने) लसीकरणाचे विकेंद्रीकरण करण्याची मागणी केली होती, परंतु आता ते केंद्रीकरणासाठी विचारत आहेत. पंजाबकडून खासगी रुग्णालयांना लस विक्री केल्याच्या आरोपावरून राहुल गांधींवर केंद्रीय नेत्यांनी हल्ला चढवला आहे. या आरोपांवर पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीरसिंग सिद्धू यांनी सरकारचा बचाव केला आहे. ते म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासमोर ही बाब ठेवू आणि त्याची चौकशी केली जाईल.

Vaccine scam in Punjab, Covaxin sold for Rs 400 to private hospitals for Rs 1060

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात