कोरोनाविरोधात पंतप्रधान मोदी यांचे ब्रम्हास्त्र ; १५ ऑगस्टपर्यंत १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने आता लसीकरण मोहिम वेगाने राबविण्याचे ठरवले आहे. त्या अंतर्गत 15 ऑगस्टपर्यंत 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी देशात 10 लाख लसीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच घराघरात जाऊन लसीकरण करण्याचा विचार सुरू आहे. Vaccination of all over 18 years of age by 15 August by modi

पुढील महिन्यापासून सुरुवात

देशात 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यास सुरुवात होणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यानुसार अंमलबजावणीसाठी योजना आखण्यात येत आहे. येत्या साडेतीन महिन्यात म्हणजेच 15 ऑगस्टपर्यंत सर्वांचे लसीकरण करण्याची योजना आहे. त्यासाठी सर्व राज्यांशी समन्वय साधला जाणार आहे. 13.5 कोटी लोकांना लस दिली आहे. भविष्यात इतर देशातील प्रभावी लसही उपलब्ध होणार आहेत. त्याद्वारे लसीकरणाला गती मिळणार आहे.



घराघरात जाऊन लसीकरण

घराघरात जाऊन लसीकरण करण्याचस विचार सुरू आहे. त्यासाठी आरोग्य सोवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्था आणि इतर संस्थाचीही मदत घेण्यात येणार आहे. परदेशातून लस मिळण्यास सुरुवात झाल्यावर या प्रक्रियेला वेग येणार आहे. 15 ऑगस्टपर्यंतचे उद्दीष्ट्य साध्या झाल्यास कोरोना लढाईचा तो मैलाचा दगड ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात