Vaccination In India surpasses US, giving 8.70 crore doses so far

Vaccination In India : लसीकरणाच्या बाबतीत भारताने अमेरिकेलाही टाकले मागे, आतापर्यंत दिले 8.70 कोटी डोस

Vaccination In India : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी म्हटले की, कोरोना-19 विरुद्ध लसीकरणात (Corona Vaccination) अमेरिकेला मागे टाकत भारत जगातील सर्वात वेगवान लसीकरण करणारा देश बनला आहे. भारत दररोज साधारणपणे 30,93,861 डोस दिले जात आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाचे 8.70 कोटींहून जास्त डोस देण्यात आले आहेत. Vaccination In India surpasses US, giving 8.70 crore doses so far


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी म्हटले की, कोरोना-19 विरुद्ध लसीकरणात (Vaccination In India) अमेरिकेला मागे टाकत भारत जगातील सर्वात वेगवान लसीकरण करणारा देश बनला आहे. भारत दररोज साधारणपणे 30,93,861 डोस दिले जात आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाचे 8.70 कोटींहून जास्त डोस देण्यात आले आहेत.

यावरूनच केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरनेही ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, सर्व देशांना मागे टाकत लसीकरणाच्या बाबतीत भारत सर्वात पुढे आहे. सकाळी सात वाजेच्या अंतिम अहवालापर्यंत एकूण 13,32,130 सत्रांमध्ये लसीचे 8,70,77,474 डोस देण्यात आलेले आहेत.

एका मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेत आतापर्यंत 171 मिलियन डोस देण्यात आलेले आहेत. दुसरीकडे, मागच्या आठवड्यात साधारणपणे 3.03 मिलियन डोस देण्यात आले होते.

कुणाला किती डोस मिळाले

यापैकी 89,63,724 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर 53,94,913 आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. दुसरीकडे, फ्रंटलाइन वर्कर्सपैकी 97,36,629 जणांना पहिला डोस, तर 43,12,826 जणांना दुसरा डोस देण्यात आलेला आहे. याशिवाय 60 वर्षांहून जास्त वयाच्या 3,53,75,953 जणांना पहिला डोस आणि 10,00,787 जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. दुसरीकडे, 45 वर्षांहून जास्त 60 वर्षांच्या 2,18,60,709 जणांना पहिला डोस आणि 4,31,933 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. मागच्या 24 तासांत 33 लाखांहून जास्त जणांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

Vaccination In India surpasses US, giving 8.70 crore doses so far

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*