‘गडकरींचा हात जगन्नाथ’ : सहापदरी उड्डाणपूल पुणेकरांना गिफ्ट ; नितीन गडकरींची घोषणा ; १६९.१५ कोटी मंजूर

  • पुण्याच्या कात्रज चौकात होणारी वाहतूक कोंडी लवकरच संपुष्टात येणार आहे.
  • यापूर्वी पुणे महानगरपालिकेने कात्रज जंक्शनजवळ उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली होती. मात्र, हे काम रखडून पडले होते. मात्र, हा उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्गाच्या जंक्शनवर असल्याने नितीन गडकरींनी काम हाती घेण्याचा निर्णय घेतला.

विशेष प्रतिनिधी

पुणे : कात्रज चौकात सहापदरी उड्डाणपूल उभारण्यासाठी केंद्र सरकारने १६९.१५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा उड्डाणपूल पुणे शहर, मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्ग आणि पुणे-सोलापूर महामार्गाला जोडण्यात येईल .रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून नुकतीच यासंदर्भात घोषणा करण्यात आली.गडकरी जे काम हातात घेतात ते पूर्णत्वास नेतात.Nitin Gadkari sanctions Rs 169.15 cr for six lane flyover at Katraj junction in Pune Maharashtra

कसा असेल हा उड्डाणपूल?

कात्रज जंक्शनवर उभारण्यात येणारा हा उड्डाणपूल 1,326 मीटर लांब आणि 24.20 मीटर रुंद असेल. पुणे-मुंबई बायपासवरुन सुरु होणारा हा उड्डाणपूल कात्रज-कोंढवा रोडवर उतरेल. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने कात्रज-कोंढवा रोडच्या रुंदीकरणाचे कामही हाती घेतले आहे.राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन आढळगाव ते जामखेड महामार्गाच्या दोन लेनच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करण्याची मागणी केली होती.

त्यांची ही मागणी गडकरी यांनी मंजूर केली आहे. आढळगाव ते जामखेड महामार्गासाठी गडकरी यांनी 399.33 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

 

Nitin Gadkari sanctions Rs 169.15 cr for six lane flyover at Katraj junction in Pune Maharashtra

 

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*