विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने कोटींची शंभरी अर्थात १०० कोटींचा टप्पा गाठल्यानंतर केंद्र सरकारने सेलिब्रेशनला सुरूवात केलीच आहे. पण त्याआधी सोशल मीडियावर त्याचे जोरदार सेलिब्रेशन सुरू झालेले दिसत आहे. VaccineCentury, 100CroreVaccination, ChooseToBeHealthy हे हॅशटॅग ट्विटरवर जोरदार ट्रेंड झाल्याचे दिसत आहेत. याखेरीज अनेकांनी १०० कोटी लसीकरण पूर्ण – केंद्र सरकार, १०० कोटी वसूली पूर्ण – राज्य सरकार अशी खिल्ली देखील उडवायला सुरूवात केली आहे. Vaccination and recovery…, hundreds of millions; Celebrations and jokes on social media too
अनेक सकारात्मक आणि खिल्ली उडविणारे मिम्स तयार व्हायला लागले आहेत. याखेरीज अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेला Truth Social हा हॅशटॅगटी भारतात ट्विटर ट्रेंड होताना दिसतो आहे.
या सगळ्या प्रकारात उत्तर प्रदेश, शेतकरी आंदोलनाचे राजकारण, आर्यन खान केस, आर्थर रोड जेल या विषयांवरचे वेगवेगळे ट्विटर ट्रेंड मागे पडलेले दिसत आहेत. आर्यन खान केसचे दोन्ही बाजूंचे ट्विटर ट्रेंडची काही तासांपूर्वी चलती होती. बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान हा आर्यन खानला आर्थर रोड जेलमध्ये भेटायला गेल्यानंतर त्याविषयीचे ट्विट्स ट्रेंड झाले होते. अनेकांनी शाहरूख खानला सहानुभूती दाखविली तर अनेकांनी त्याच्यावर टीकास्त्र देखील सोडले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App