Uttarakhand Elections : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज उत्तराखंडमधील हल्दवानी येथे पोहोचले. यादरम्यान त्यांनी उत्तराखंड निवडणुकांबाबत मोठी घोषणा केली आहे. केजरीवाल यांनी उत्तराखंडमधील सर्व बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले, जोपर्यंत बेरोजगार व्यक्तीला रोजगार मिळत नाही, तोपर्यंत प्रत्येक कुटुंबातील एका युवकाला दरमहा 5,000 रुपये दिले जातील. Uttarakhand Elections AAP Arvind Kejriwal press Conference Big Announcement separate Ministry For Employment and migration
विशेष प्रतिनिधी
हल्दवानी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज उत्तराखंडमधील हल्दवानी येथे पोहोचले. यादरम्यान त्यांनी उत्तराखंड निवडणुकांबाबत मोठी घोषणा केली आहे. केजरीवाल यांनी उत्तराखंडमधील सर्व बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले, जोपर्यंत बेरोजगार व्यक्तीला रोजगार मिळत नाही, तोपर्यंत प्रत्येक कुटुंबातील एका युवकाला दरमहा 5,000 रुपये दिले जातील.
केजरीवाल म्हणाले, उत्तराखंडमध्ये आमचे सरकार स्थापन झाले तर 300 युनिट मोफत वीज दिली जाईल आणि जुनी वीज बिले माफ केली जातील. 24 तास वीज दिली जाईल. मी जे सांगतो ते मी करतो. आम्ही सांगितले की, आम्ही मोफत वीज देऊ.. मग देऊच. तसेच आपले सरकार स्थापन झाल्यास उत्तराखंडमधील सर्व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. जोपर्यंत बेरोजगार व्यक्तीला रोजगार मिळत नाही, तोपर्यंत प्रत्येक कुटुंबातील एका युवकाला दरमहा 5,000 रुपये दिले जातील. सरकारी आणि खासगीमध्ये 80 टक्के नोकऱ्या उत्तराखंडच्या मुलांसाठी राखीव असतील.
केजरीवाल पुढे म्हणाले, ‘आम्ही दिल्लीमध्ये जॉब पोर्टल तयार केले होते, उत्तराखंडमध्येही असेच जॉब पोर्टल बनवले जाईल. रोजगार आणि स्थलांतर व्यवहार मंत्रालय तयार केले जाईल. रोजगार निर्माण करणे हे त्याचे कार्य असेल. उत्तराखंडच्या तरुणांना स्थलांतर करण्यापासून रोखले पाहिजे आणि स्थलांतर केलेल्यांना परत आणण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करावे लागेल. कोठियाल साहेबांना नोकर्या कशा मिळवायच्या हे माहिती आहे, रोजगाराच्या संधी नसताना त्यांनी तरुणांना नोकऱ्या दिल्या. जर तुम्ही भाजपला मत दिले तर तुम्हाला दरमहा एक मुख्यमंत्री मिळेल, अशी टीकाही त्यांनी केली.
Uttarakhand Elections AAP Arvind Kejriwal press Conference Big Announcement separate Ministry For Employment and migration
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App