विशेष प्रतिनिधी
लखनऊ : दंगली होतात तेव्हा प्रत्येक धर्म आणि पंथाचे लोक प्रभावित होतात. जर हिंदूची घरे जळणार असतील तर मुसलमानांची घरे थोडी सुरक्षित राहील. हिंदू सुरक्षित राहील तर मुसलमानही सुरक्षित राहील, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath warns that if houses of Hindus are to be burnt, then houses of Muslims also will not be safe.
कोणी भारतविरोधी आणि हिंदूविरोधी आहे तो योगी आणि मोदींना कधीही स्वीकारू शकणार नाही. ही निवडणूक 20% विरुद्ध 80% अशी असेल, असेही त्यांनी सांगितले. एका दूरचित्रवाहिनीवर बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाल की, आम्ही गेल्या पाच वर्षात एकही दंगल होऊ दिली नाही.
1990 मध्ये काँग्रेस विरोधातील विविध पक्षांची सत्ता आली. त्यावेळी रामभक्तांवर गोळ्या झाडण्याचं पाप समाजवादी पक्षाने केलं. फक्त 1990 सालीच नाही नंतर जेव्हा-जेव्हा समाजवादी पक्षाला संधी मिळाली तेव्हा कोणताही व्यक्ती स्वत:ला सुरक्षित समजत नव्हतं. सपा सरकारच्या काळात दंगलींच्या आगीमध्ये उत्तर प्रदेश जळत होता. आज आम्ही बोलू शकतो की, आम्ही उत्तर प्रदेशला दंगामुक्त केले.
ही निवडणूक 20% विरुद्ध 80% अशी असेल. यापैकी 80% असे लोक आहेत जे सकारात्मक आहेत आणि उरलेले आहेत जे नेहमी आम्हाला विरोध करतील. आम्ही अगदी त्यांना ताट वाढून दिले तरी ते शिव्या देतील, असेही योगींनी सांगितले.
मथुरेबाबत विचारलेल्या प्रश्नावर योगी आदित्यनाथ म्हणाले,आपल्या भूतकाळाच्या गौरवाच्या पुनर्सथापनेचं एक अभियान चालवलं जात आहे. आपण भारत आणि भारतीयताच्या गौरवाचा अनुभव घेण्यासाठी हे अभियान आहे. आम्ही मथुरेलाही जाणार ज्याच्यात दम आहे तोच मथुरा बनवणार.
जे बोलत होते ते काहीच करु शकले नाहीत आणि आज अयोध्याला चकरा मारत आहेत. हेच लोक म्हणायचे, जेव्हा अयोध्येचा निकाल येईल तेव्हा रक्ताच्या नद्या वाहतील. त्या लोकांनी बघितलं आता की, आम्ही कशाप्रकारे भव्य राम मंदिर बनविण्यासाठी पाऊल टाकलं आहे. राष्ट्रवाद हाच आमचा अजेंडा आहे.
राममंदिर हे सांस्कृतिक राष्ट्रवादचा एक वाटा आहे. विश्वनाथचं धान आणि कुंभही त्याचाच वाटा आहे. पावन भूमीला दिव्य आणि भव्य बनविणं हे आमच्या राष्ट्रवादाचा एक भाग आहे”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आपल्या स्वप्नात श्रीकृष्ण आल्याचा दावा केला होता.
त्याची खिल्ली उडविताना योगी आदित्यनाथ म्हणाले, त्यांच्या स्वप्नात कृष्ण आले असतील तर म्हणाले असतील, बेटा तू आता कामातून गेलास. तुमच्या नशिबी फक्त तीन जागा येणार. बाकीच्या 400 जागा भाजपला मिळणार. ज्यांचा श्रीराम आणि कृष्णांवर विश्वास नव्हता ते आज श्रीराम आणि कृष्णांचे नाव तोंडावर घेत आहेत.
काँग्रेसने रामसेतूबद्दल जेव्हा राम मिथक असल्याचं म्हटलं होतं तेव्हा सपाने त्यांचं समर्थन केलं होतं. खरंतर त्यांच्याजवळ आता काहीच शिल्लक राहिलीले नाही. त्यामुळे ते राम आणि कृष्णाच्या शरण आले आहेत. पण खरा भक्त कोण ते देवही पाहतो.
आम्हाला दायित्व मिळालं तेव्हा आम्ही रामभक्तांसाठी काम केलं. त्यांना जेव्हा संधी मिळालेली तेव्हा त्यांनी रामभक्तांवर गोळ्या झाडल्या. 400 जागा कुणाल्या द्यायच्या याचा विचार जनतेने केलेले आहे”, असंदेखील योगी यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App