विशेष प्रतिनिधी
पणजी : पक्षाविरोधात बंड पुकारुन पणजी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा करणारे उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून पणजीतून माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे. पण यासाठी त्यांनी भाजपसमोर एक पेच टाकला आहे.Utpal Parrikar’s withdrawal; But the BJP was put in a dilemma
भाजपनं पणजी मतदारसंघातून उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी बंड करत भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. तसेच आपण पणजीतून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचंही जाहीर केलं होतं. भाजपाने पणजीतून विद्यमान आमदार मॉन्सरेट यांना मैदानात उतरवलं आहे.
मागील अनेक वषार्पासून पणजीतून मनोहर पर्रिकर यांनी नेतृत्व केले होते. मात्र त्यानंतरच्या पोट निवडणुकीत मॉन्सरेट यांनी काँग्रेसच्या तिकीटावर बाजी मारली. कालातरांना मॉन्सरेट यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे भाजपानं पणजीतून त्यांना उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाच्या या निर्णयामुळे उत्पल पर्रिकर दुखावले गेले.
पर्रिकर म्हणाले, पणजी मतदारसंघातून लढणं हा माझा सैद्धांतिक मुद्दा आहे. मी कालच म्हटलं होतं की, भाजपनं जर गुन्हेगारी रेकॉर्ड नसलेल्या प्रामाणिक उमेदवाराला पणजी मतदारसंघातून उमेदवारी दिली तर मी अपक्ष म्हणून माघार घ्यायला तयार आहे. भाजपा सोडण्याचा निर्णय सर्वात कठीण होता. जर पणजीतून चांगल्या उमेदवाराला पक्षाने तिकीट दिली असती तर मी निवडणूक लढवली नसती असा दावा उत्पल पर्रिकर यांनी केला आहे.
उत्पल पर्रिकर म्हणाले की, पक्ष सोडणं सर्वात कठीण निर्णय होता. हा निर्णय मला घ्यावा लागणार नाही अशी अपेक्षा होती परंतु मला हा निर्णय करणं भाग पडलं. परंतु कधी कधी कठीण निर्णय घ्यावे लागतात. माझ्या वडिलांचे विरोधक पक्षात मोठ्या पदावर आहेत.
मला पक्षाने तिकीट दिली नाही ते १९९४ च्या स्थितीसारखं आहे. जेव्हा माझे वडील मनोहर पर्रिकर यांना पक्षातून बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. त्यावेळी मनोहर पर्रिकर यांना लोकांचे मोठं समर्थन होते. त्यामुळे त्यांना बाहेर काढता आले नाही. आता ते विरोधक पक्षात मोठ्या पदावर आहेत. तर मी जनतेच्या सोबत आहे.
उत्पल पर्रिकर यांनी २०१९ च्या पणजी पोटनिवडणुकीचाही उल्लेख केला. मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर पणजीत पोटनिवडणूक घेण्यात आली होती. त्यावेळी लोकांचं समर्थन असतानाही मला तिकीट देण्यात आली नाही. जेव्हा जे. पी नड्डा गोव्यात आले होते तेव्हा ५ दाम्पत्यांनी निवडणुकीत तिकीट मागितलं होतं. जर मनोहर पर्रिकर जिवंत असते तर एकाही पुरुष नेत्याने स्वत:च्या पत्नीला तिकीट मागण्याची हिंमत केली नसती.
पर्रिकर यांना उमेदवारी नाकारताना भाजपचे गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, भाजप नेत्याचा मुलगा म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात येणार नाही तर निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारालाच भाजप उमेदवारी देईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App