वृत्तसंस्था
जाकार्ता : हिंद प्रशांत क्षेत्रातील चीनच्या विस्तारवादी आणि आक्रमक धोरणांना आळा घालण्यासाठी अमेरिका आशियातील मित्रदेशांबरोबर लष्करी आणि आर्थिक संबंधांत वाढ करेल, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सांगितले. ब्लिंकन हे अग्नेय आशियाच्या दौऱ्यावर असून इंडोनेशियानंतर ते मलेशिया आणि थायलंड या देशांना भेट देणार आहेत. हाँगकाँग आणि तैवान या मुद्यांवरून चीनला कोंडीत पकडणे, हा ब्लिंकन यांच्या दौऱ्याचा उद्देश असल्याचे मानले जात आहे. USA will develop realtions with asian countries
ब्लिंकन म्हणाले, ‘‘हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी अमेरिका कटिबद्ध आहे. यासाठी आम्ही नवीन देशांशी मैत्रीचे संबंध निर्माण करत आहोत. त्याचप्रमाणे या शांततेला अडथळा येऊ नये म्हणून लष्करालाही सज्ज ठेवत आहोत. मात्र, आमचे मित्र देश आणि भागीदार देश हीच आमची खरी ताकद आहे.’’ चीनच्या वाढत्या आक्रमकपणाला आळा घालण्यासाठी आम्ही दक्षिण आशियातील देशांशी चांगले संबंध निर्माण करत आहोत. मात्र, अमेरिका किंवा चीन यातील एक पर्याय निवडण्याची कोणत्याही देशावर सक्ती करत नाहीत. या प्रदेशात शांतता कायम टिकवून राहणे, हेच आमचे उद्दीष्ट आहे, असेही ब्लिंकन म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App