घटनास्थळी बचावकार्य सुरूच आहे. या घटनेचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही, असे अमेरिकन अधिकारी सॅम्युअल पेनिया यांनी सांगितले. USA: At least eight people die in a horrific accident at a music festival
विशेष प्रतिनिधी
वॉशिंगटन : अमेरिकेत सुरू असलेल्या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये एक दुर्घटना घडली आहे. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.घटनास्थळी बचावकार्य सुरूच आहे. या घटनेचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही, असे अमेरिकन अधिकारी सॅम्युअल पेनिया यांनी सांगितले.
अमेरिकन अधिकारी या घटनेचे मुख्य कारण सांगण्यास नकार देत असले तरी, मिळालेल्या माहितीनुसार, गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे हा अपघात झाला. सांगीतले जात आहे की, संगीत महोत्सवामुळे स्टेजच्या जवळ जाणाऱ्या लोकांवर नियंत्रण नव्हते.यादरम्यान गर्दी अनियंत्रित झाली, त्यामुळे लोक एकमेकांच्या अंगावर आले. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला. जवळपास ३०० लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे, ज्यामध्ये आतापर्यंत १७ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये ११ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App