अफगाणिस्तानमधील जनतेला अमेरिका सरकार कडून मिळणार मदत!


विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या वर्चस्वामुळे अफगाणिस्तान मधील सामान्य जनतेला गंभीर मानवतावादी संकटाचा सामना करवा लागतो आहे. शिक्षण, उद्योग अश्या बऱ्याच गोष्टींवर परिणाम झालेला दिसून येतोय. म्हणून तेथील लोकांना मदत करण्यासाठी अमेरिकेने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. 14. 4 करोड डॉलर ची मदत अमेरिका करेल.

US government to help people in Afghanistan

युनायटेड नेशन्सचे हाय कमिश्नर फॉर रिफ्युजीज (UNHCR), युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड (UNICEF), इंटरनॅशनल द ऑर्गनायझेशन यासह स्वतंत्र आंतरराष्ट्रीय आणि गैर-सरकारी मानवतावादी संस्थांना ही थेट मदत पुरवली जाईल, असे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी गुरुवारी सांगितले.


AFGANISTAN : तालिबानची कथनी एक करनी एक : शांततेचे आश्वासन देऊन तालिबानचा काबूल विमानतळावर महिला आणि मुलांवर हल्ला


ब्लिंकेन म्हणाले, “हा निधी या प्रदेशातील 18 दशलक्षाहून अधिक गरजू अफगाण लोकांना थेट मदत करेल. त्याचप्रमाणे शेजारील देशांमध्ये आश्रय घेत असलेल्या अफगाण निर्वासितांना देखील या निधीचा फायदा मिळणार आहे.”

परराष्ट्र मंत्री म्हणाले, ‘ही मदत आमच्या भागीदारांना आवश्यक जीवन सुरक्षा, अन्न सुरक्षा, अत्यावश्यक आरोग्य सेवा, आरोग्य सेवेच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर वाढत्या मानवी गरजा, कोविड-19, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.

US government to help people in Afghanistan

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात