विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शुक्रवारी प्रियकां गांधीना पत्रकारांनी काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? असा प्रश्न केला. त्यावर काँग्रेसमध्ये दुसऱ्या कोणाचा चेहरा दिसतोय का? उत्तर प्रदेशात सगळ्या ठिकाणी माझाच चेहरा दिसतोय ना, असे उत्तर देत प्रियंका यांनी काँग्रेसतर्फे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आपणच असल्याचे जाहीर केले होते मात्र आता साफ नकार देत मी चिडून तसं बोलले असं त्या म्हणाल्या आहेत. तर उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसचा चेहरा म्हणून प्रियंका गांधींना पुढे केले जात होते. त्यापार्श्वभुमीवर प्रियंका गांधी यांनी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आपणच उत्तरप्रदेश निवडणूकीत काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार असल्याचे वक्तव्य केले होते. UP ELECTION: Yesterday, Chief Minister, go around today! ‘Vague’ denial of Priyanka Gandhi who calls herself the face of UP Congress …
त्यानंतर त्यांच्या निर्णयाचे स्वागत तर काहींनी त्यांच्या निर्णयावर टीका केली. त्यानंतर एनडीटीव्हीशी बोलताना प्रियंका गांधी यांनी आपण उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणूक लढवू पण आपण मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार नसल्याचे स्पष्ट केले.
शुक्रवारी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेश निवडणूकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिध्द केला. त्यावेळी उत्तर प्रदेश साठी काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला होता. त्यावर उत्तर देतांना तुम्हाला दुसरा कोणाचा चेहरा दिसतोय का? सगळीकडे माझाच चेहरा दिसतोय ना? असे उत्तर देत आपणच मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती.
निवडणूक जाहीरनामा प्रसिध्द केल्यानंतर प्रियंका गांधी यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर मी मस्करी केली होती. मला प्रत्येक वेळी हा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे मी तसे उत्तर दिले. मात्र मी मुख्यमंत्री पदाची उमेदवार नाही. पण मी निवडणूक लढवू शकते, असे सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App