विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रेमीजनांसाठी हक्काचे ठिकाण म्हणजे शहरातील बागा. परंतु, सार्वजनिक ठिकाणी प्रेमाचं प्रदर्शनाच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर हैदराबाद महानगरपालिकेने एका बागेत अविवाहीत जोडप्यांना बंदीचे आदेश काढले. मात्र, या ‘तालिबानी’ आदेशांना विरोध झाल्यानंतर केवळ दोन दिवसांत आपला आदेश मागे घेण्याची नामुष्की महानगरपालिकेवर ओढावलीय.Unmarried couples banned from going to the garden, disgraced to withdraw Taliban orders
हैद्राबाद शहरातील ६८ एकर परिसरात फैलावलेल्या इंदिरा पार्कमध्ये अविवाहीत जोडप्यांना प्रवेश न देण्याचा निर्णय पालिकेनं घेतला होता. यासाठी अविवाहीत जोडप्यांना बागेत येण्याची परवानगी नाही असं लिहिलेला एक बोर्ड बागेच्या गेटवर झळकावण्यात आला होता. ही बाग ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉपोर्रेशनच्या अंतर्गत येते.
सोशल मीडियाद्वारे या बॅनरचे फोटो शहरात व्हायरल झाले होते. अशा पद्धतीच्या आदेशांना तरुणांकडून आणि सुजान नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. नागरिकांच्या ‘नैतिकते’वर प्रश्नचिन्ह ठेवण्यासाठी हैदराबाद महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं.यानंतर, महानगरपालिकेकडून आपली चूक मान्य करत हे बॅनर हटवण्यात आले. आपला हेतू चुकीचा नव्हता मात्र बॅनरवर चुकीचे शब्द वापरण्यात आल्याचं महापालिकेनं मान्य केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App