मुलीच्या जन्माचा अनोखा उत्सव, भोपाळमधील पाणीपुरी विक्रेत्याने ५० हजार पाणीपुरी वाटून दिला समाजाला संदेश


विशेष प्रतिनिधी

भोपाळ: भोपाळ येथील पाणीपुरी विक्रेत्याने मुलीच्या जन्माचा अनोखा उत्सव साजरा करून समाजाला संदेश् दिला आहे. मुलीचा जन्म झाल्यावर त्याने चक्क ५० हजार पाणीपुरी वाटल्या.भोपाळमधील पाणीपुरी विक्रेते अंचल गुप्ता यांचे कोलार परिसरातील रस्त्यावर त्यांचे पाणीपुरीचे छोटे दुकान आहे. त्यांनी रविवारी लोकांना मोफत झणझणीत पाणीपुरी वाटून मुलीच्या जन्माचे स्वागत केले.Unique celebration of daughter’s birth, Panipuri seller in Bhopal distributed 50,000 Panipuri message to the community

मुलीच्या जन्माने माझे स्वप्न साकार झाले. लग्न झाल्यापासून मुलगी जन्माला यावी, अशी माझी इच्छा होती. परंतु, दोन वर्षांपूर्वी पहिला मुलगा झाला. यावर्षी १७ ऑगस्ट रोजी मुलीच्या जन्माने देवाने इच्छा पूर्ण केली.



मुलाचा दुसरा वाढदिवस होता. त्यामुळे मी भोपाळच्या लोकांना मोफत पाणीपुरी वाटूनमुलगी आहे, तर भविष्य आहे, असा संदेश देऊन मुलीचा जन्म साजरा करण्याचे ठरविले. गुप्तांचे शिक्षण आठवीपर्यंत झालेले आहे. पाणीपुरी विक्रेता अंचल गुप्ताने रविवारी ३५ ते ४० हजार रुपयांची पाणीपुरी लोकांना मोफत वाटली.

खर्चापेक्षा मला मुलगी असल्याचा मोठा आनंद आहे, असे त्याने म्हटले.रविवारी दुपारपासून ते सायंकाळपर्यंत गुप्ता यांच्या पाणीपुरीच्या दुकानांवर लोकांची गर्दी उलटली होती. पाणीपुरीचा आस्वाद घेत अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.

Unique celebration of daughter’s birth, Panipuri seller in Bhopal distributed 50,000 Panipuri message to the community

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात