विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात स्वत:च्या खर्चाने एसी लावणाºया कन्हैयाकुमार यांच्याकडे १८ कोटी रुपयांची संपत्ती असल्याची चर्चा आहे. बेरोजगार असूनही कन्हैयाने ऐवढी संपत्ती कशी मिळविली असा सवालही केला जात आहे. व्याख्याने देऊन कन्हैयाकुमार आपला चरितार्थ चालवित असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. Unemployed Kanhaiyakumar has assets worth Rs 18 crore
कन्हय्याकुमारच्या काँग्रेस प्रवेशानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनेकांनी बेरोजगार असलेल्या कन्हय्याच्या संपत्तीबाबत आणि रोजगाराबाबतही चर्चा सुरू केली. लोकसभा निवडणुकीच्यावेळी कन्हय्याकुमारच्या संपत्तीवरून चांगलाच वाद रंगला होता. त्याच्याकडे संपत्तीचा कुठलाही स्रोत नसताना त्याची संपत्ती 18 कोटी असल्याचा दावा करण्यात आला होता. त्याने दिलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रानुसार, तो बेरोजगार असून, त्याच्याकडे सहा लाख रुपयांची संपत्ती होती. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या माहितीनुसार त्याच्याकडे ना घर आहे ना गाडी. बेगुसरायमधील बीहट या गावी थोडी जमीन आहे तीदेखील वारसा हक्काने मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या रोजगाराचे साधन काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
कन्हैयाकुमार हा बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील आहे. त्याची आई अंगणवाडी सेविका आहे तर मोठा भाऊ रतिकांत आसाममधील एका कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला आहे.
कन्हैयाकुमार २०१५ मध्ये जवाहरलाला नेहरू युनिव्हर्सिटीचा (जेएनयू) छात्रसंघाचा अध्यक्ष म्हणून निवडून आला. त्यानंतर जेएनयूमध्ये भारताविरुध्द घोषणांचा प्रकार घडला. ‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा कथित घोषणा देण्यात आल्या होत्या. या प्रकरणात कन्हैयाला तुरुंगातही जावे लागले होते. मात्र, त्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांवर आणि जाहीर कार्यक्रमांत कन्हैया कुमार सातत्याने दिसू लागला. मोदी सरकारविरोधातील चेहरा म्हणून ओळख मिळाली. या काळात देशात विविध ठिकाणी कन्हैया कुमार विमानाने फिरत होता. त्याच्या रोजगाराचे साधन काय असे विचारले असता त्याचे समर्थक भाषणे हे सांगतात. मात्र, त्याबाबत हिशोब मात्र नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App