अयोध्या – काशी : ठाकरे काका – पुतण्यांचा अयोध्या वारीचा गाजावाजा; फडणवीसांचा त्यांच्या आधीच काशी दौरा!!


ठाकरे काका पुतण्यांचा अयोध्या वारीचा नुसताच गाजावाजा सुरू असताना मधल्यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांच्या आधीच आपला काशी दौरा करून घेतला आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात आपापल्या सरकारांची ऑफिस उघडण्यावरून जोरदार राजकीय धमासान सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही गाजावाजा न करता काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचा दौरा केला आहे. Uncle Thackeray – Putanyancha Ayodhya Wari’s Gajavaja; His already Kashi tour of Fadnavis

पण यातच खरे राजकीय रहस्य दडले आहे. ज्या उत्तर भारतीय मतदारांना आणि हिंदूंना आकर्षित करण्यासाठी शिवसेना आणि मनसे यांचे नेते अयोध्या दौरा करू इच्छितात, त्यांच्या आधीच कोणताही गाजावाजा न करता देवेंद्र फडणवीस यांनी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचा दौरा करून आपल्याला जे राजकीय इप्सित साध्य करायचे आहे ते करून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

– अयोध्या – काशी एक है

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याने आपण पहिल्यांदाच बाबा विश्वनाथाच्या दर्शनासाठी आल्याचे समाधान आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले. त्यांच्या समवेत मुंबईतले काँग्रेसचे माजी नेते आणि भाजपचे विद्यमान नेते कृपाशंकर सिंह हे होते. अयोध्या के बाद आप काशी की बारी है क्या?, असा प्रश्न विचारल्यानंतर बारी बारी यह क्यू पुछते है? आयोध्या – काशी एक है. बाबा विश्वनाथ का आशीर्वाद सब पर है, असे सूचक उत्तर त्यांनी ज्ञानवापी मशिदीच्या वादासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला दिले. सध्या हा वाद कोर्टात असल्यामुळे त्यावर काही भाष्य करणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

– ठाकरेंच्या विरोधाला महाराष्ट्रातून कुमक

ठाकरे काका – पुतणे अर्थात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे अयोध्या दौरे अजून 15 – 20 दिवस लांब आहेत, तरी त्यांचे दोन्ही पक्ष हे दौरे रोज गाजवत आहेत. उत्तर प्रदेश मधील भाजपच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे. या विरोधाच्या उलटसुलट बातम्या रोज प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातूनच कुमक मिळते आहे, असे भाजपच्या नेत्यांनी सूचक पद्धतीने सांगितले आहे.

– राजकीय इरादा स्पष्ट

पण हे सर्व घडत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मात्र कोणताही गाजावाजा न करता कृपाशंकर सिंह यांना घेऊन उत्तर प्रदेशचा विशेषत: काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचा दौरा करून आपला ही राजकीय इरादा पुरेसा स्पष्ट केला आहे. त्यासाठी त्यांनी ना मराठी माध्यमांच्या प्रसिद्धीची अपेक्षा केली, ना कोणती राजकीय चर्चा घडवून आणली. महाराष्ट्रात कोणताही “प्रसार माध्यमी गाजावाजा” न करता फडणवीसांनी काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचा दौरा केला आणि आपल्याला जे साध्य करायचे ते करून घेतल्याचे स्पष्ट दिसते आहे.

मोदींच्या संपर्क कार्यालयाला भेट

काशीमध्ये फडणवीस यांनी बाबा विश्वनाथ मंदिराबरोबरच दुर्गा माता मंदिराला भेट देऊन पूजा-अर्चना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची भेट म्हणून त्यांनी वाराणसी पत्रकार संघाच्या कार्यालयात जाऊन स्थानिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष चंद्र सिंह आणि अन्य पत्रकारांशी संवाद साधला. यातून फडणवीसांना मुंबई महापालिका, ठाणे महापालिका तसेच अन्य निवडणुकांमध्ये जी राजकीय पेरणी करायची आहे, त्यादृष्टीने त्यांनी राजकीय मशागत करून घेतली आहे. किंबहुना ठाकरे काका-पुतण्यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी भाजपला जे साध्य करायचे आहे, त्याची असाइनमेंट फडणविसांनी हाती घेतली आहे.

Uncle Thackeray – Putanyancha Ayodhya Wari’s Gajavaja; His already Kashi tour of Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात