मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमि वाद : 4 महिन्यांत सर्व कोर्ट केसेस निकाली काढा, मुस्लिम पक्ष आला नाही तर परस्पर निकाल देऊ; अलाहाबाद हायकोर्टाची चपराक!!


वृत्तसंस्था

अलाहाबाद : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमि आणि ईदगाह मशिद यांच्यातील जमीन वादात सेशन कोर्टासह अन्य कोर्टांमधल्या सर्व केसेस येत्या 4 महिन्यांमध्ये निकाली काढा. आवश्यकता असेल, तर दररोज सुनावणी घ्या. पण या केसेसचा निकाल दिल्याशिवाय थांबू नका. मुस्लिम पक्ष सुनावणीसाठी समोर आला नाही तर परस्पर निकाल द्या, अशा स्पष्ट शब्दात अलाहाबाद हायकोर्टाने फटकार लगावली आहे. Mathura Shrikrishna Janmabhoomi Dispute: Settle all court cases in 4 months

या संदर्भात मनीष यादव यांनी दाखल केलेल्या मूळ याचिकेवर हायकोर्टाने सुनावणी घेत हिंदू पक्ष, मुस्लिम पक्ष आणि सरकार या तिन्ही पक्षांना फटकारले आहे. श्रीकृष्ण जन्मभूमि आणि ईदगाह मशिद यांच्यातील वादाच्या सुनावणीच्या वेळी हजर राहणे आवश्यक आहे. त्यात कुठलीही दिरंगाई होता कामा नये. या संदर्भात जेवढ्या म्हणून सेशन कोर्टात अथवा वरच्या कोर्टात केसेस दाखल असतील त्या सर्वांचा निकाल येत्या 4 महिन्यात लावून मोकळे करा. त्यातून प्राथमिक अवस्थेतील केसेस संपल्यानंतर हायकोर्टाला सुनावणी घेऊन निकाल देणे सुलभ होईल, असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.हायकोर्टाने थेट अशी फटकार लावल्यामुळे जो मुस्लिम पक्ष स्टेशन कोर्टातील सुनावणीच्या वेळी गैरहजर राहत होता. त्यांना आता हजर राहावे लागणार आहे. त्याचबरोबर सुनावणीत सहभागी झाले नाहीत, तर परस्पर निकाल देण्याचाही धोका आहे. अलाहाबाद हायकोर्टाच्या आजच्या निर्णयात तसेच स्पष्ट म्हटले आहे. त्यामुळे येत्या 4 महिन्यांमध्ये श्री कृष्ण जन्मभूमि आणि ईदगाह मशिद यासंदर्भातील सर्व भाग सेशन कोर्टात निपटारा होऊन हायकोर्टात येऊन त्यावर सुनावणी होणे अपेक्षित आहे.

Mathura Shrikrishna Janmabhoomi Dispute: Settle all court cases in 4 months

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात