श्रीनगरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा


विशेष प्रतिनिधी

जम्मू : श्रीनगरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार दोघेही स्थानिक दहशतवादी आहेत. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. काही आक्षेपार्ह साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे. Two terrorists killed in Srinagar

काश्मीरचे आयजीपी, पोलीस महासंचालक विजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही दहशतवादी अलीकडील अनेक घटनांमध्ये सहभागी होते. अनेक नागरिकांना मारण्यातही त्यांचा हात आहे.



दरम्यान, राज्यसभेत दिलेल्या तपशिलानुसार, गेल्या पाच वर्षांत दहशतवादी हल्ल्यांमध्ये तसेच दहशतवादविरोधी कारवायांमध्ये १५६ लष्करी जवान आणि तीन आयएएफ जवान शहीद झाले आहेत. एका प्रश्नाला उत्तर देताना, संरक्षण राज्यमंत्री, अजय भट्ट म्हणाले की, २०१७ मध्ये दहशतवादी हल्ले/दहशतवादविरोधी कारवायांमध्ये लष्कराची प्राणहानी ४० होती जी २०१८ मध्ये वाढून ४७ झाली. भट्ट यांच्या लेखी उत्तरानुसार, गेल्या पाच वर्षांत दहशतवादी हल्ले/दहशतवादविरोधी कारवायांमध्ये जखमी झालेल्या लष्कराच्या जवानांची संख्या ३२३ होती.

Two terrorists killed in Srinagar

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था