मुंबई-श्रीनगर अंतर केवळ २० तासांत, २०२४ पर्यंत भारतातील रस्ते अमेरिकेच्या बरोबरीचे


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मुंबई ते श्रीनगर हे अंतर रस्ते मागार्ने केवळ २० तासांत पूर्ण करता येईल, अशा प्रकारे मार्ग तयार केला जात आहे. २०२४ च्या अगोदर भारतातील रस्ते अमेरिकेच्या बरोबरीचे झालेले असतील, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.Mumbai-Srinagar distance in just 20 hours, by 2024, India’s roads are on par with the US

खासदार फारुख अब्दुल्ला यांच्या प्रश्नावर उत्तर देताना नितीन गडकरी यांनी रस्ते कामांची यादीच सादर केली. गडकरी म्हणाले, केवळ जम्मू-काश्मीरसाठी आम्ही ६० हजार कोटींची कामं करत आहोत. जोझीला टनल बनत आहे. लडाख आणि लेहपासून श्रीनगरपर्यंत पोहचण्यासाठी किती अडचणी येत होत्या, आता झेरमोर बोगदा देखील तयार होत आहे.जोझिला टनलमध्ये सद्यस्थितीस एक हजार लोक उणे आठ डिग्री तापमानात आतमध्ये जाऊन काम करत आहेत. २०२६ मध्ये काम पूर्ण होण्याची तारीख होती. परंतु मी त्यांना सांगितलं की २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर मला वाटतं की, हे एक ऐतिहासिक काम होईल. लडाख आणि लेहमध्ये येण्या अगोदर जर आपण सिमल्यावरून मनालीपर्यंत जातो,

तर मनालीमध्ये आपली अटल टनल बनली आहे. पूर्वी साडेतीन तास लागत होते आता केवळ आठ मिनिटांमध्ये पोहचतो. आता तिथून अटल टनलमधून निघाल्यानंतर हिमालयाच्यावरून तिथे इतकं सुंदर आहे की मी ते पूर्णपणे डोळ्यांमध्ये साठवू शकलो नाही. आम्ही चार टनल बनवत आहोत. लडाख, लेहमधून येण्यासाठी रस्ता बनवत आहोत,

बराच बनला आहे. लडख, लेहपासून थेट कारगिल, कारगिलहून झेरमोर आणि झेरमोरहून श्रीनगर आणि मग श्रीनगर ते जम्मू दरम्यान आम्ही महामार्ग बनवत आहोत. त्याच पाच टनल बनवत आहोत.गडकरी म्हणाले, जेव्हा आपण श्रीनगरहून जम्मूकडे जाऊ, तेव्हा त्याच्या मध्यात कटाराच्या अगोदर आपण जो दिल्ली ते कटार, दिल्ली-अमृतसर-कटरा एक्स्प्रेस हायवेचं काम सुरू झालं आहे.

आता काश्मीरची कामं देखील देण्यात आली आहेत आणि मग कटरा-श्रीनगर-अमृतसर मार्गे दिल्लाला येऊ आणि दिल्ली-मुंबई महामागार्ला लागू. मी तुम्हाला हा विश्वास देऊ इच्छितो की लडाख आणि लेहवरून आपण श्रीनगरला आल्यानंतर श्रीनगरहून थेट आपण मुंबईला जाऊ आणि मी हे सांगू इच्छितो की हे वर्ष संपण्या अगोदर माझा प्रयत्न असेल की श्रीनगरहून तुम्ही २० तासांच्या आत मुंबईला पोहचाल.

Mumbai-Srinagar distance in just 20 hours, by 2024, India’s roads are on par with the US

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर