शोपियाँत दोन दहशतवाद्यांचा खातमा , दहशतवाद्यांच्या शोधासाठी काश्मीरमध्ये व्यापक मोहीम

विशेष प्रतिनिधी

जम्मू – जम्मू-काश्मींरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शोपियाँ जिल्ह्यातील चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. पूँचमधील सुरणकोट व राजौरीतील थानामंडी जवळील जंगलात शोध घेत असताना सुरक्षा पथक व दहशतवाद्यांमध्ये कोणताही संघर्ष झाला नाही. संपूर्ण भागाला सुरक्षा पथकाने वेढा घातला असून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वास्त करण्यासाठी मंगळवारी शोध मोहिमेला वेग देण्यात आला.Two terrorist killed in Kashmir

पूँच व राजौरी जिल्ह्यांच्या सीमांवर रविवारी (ता.१०) व सोमवारी (ता.११) दहशतवादी आल्याची माहिती मिळाल्याने भारतीय लष्कर व जम्मू-काश्मी र पोलिसांनी सहदरा भागात दहशतवाद विरोधी मोहीम सुरू केली, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.

पूँच जिल्ह्यातील चकमकीत काल लष्कराचे पाच जवान हुतात्मा झाल्याने युवकांच्या एका गटाने पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी केली. शोपियाँ जिल्ह्यातील फिरीपुरा भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्याने सुरक्षा दलाने या परिसराला वेढा घालून आज शोधमोहीम हाती घेतली.

त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देताना चकमक उडाली. यात दोन दहशतवादी मारले गेले. शोपियाँतीलच इमामसाहिब परिसरात काल सायंकाळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले.

Two terrorist killed in Kashmir

महत्त्वाच्या बातम्या