विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या राजकारणाचे सर्व रस्ते लखीमपुर खीरीकडे वळलेले असताना सोशल मीडियात देखील लखीमपुर खीरी ट्रेंडिंगला आहे. ट्विटरवर #लखीमपुर खीरी नरसंहार हँशटँग जोरदार ट्रेंड झाला असून 48000 पेक्षा जास्त ट्विटस् आणि रिट्विटस् झाले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून योगी जी लटपट जावो ल लोटो बजाओ हा हायटेक देखील ट्विटर वर जोरदार ट्रेंड झाला आहे. त्याचे 33000 पेक्षा जास्त ट्विट आणि रिट्विटस् झाले आहेत. Twitter war irrupts between congress and BJP supporters over lakhimpur khiri incidents
त्याचबरोबर विरोधी पक्ष नेत्यांपैकी प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव ट्रेडिंग मध्ये असून सर्व विरोधक लखीमपुर खीरीकडे जाण्यासाठी लाईन लावून बसले आहेत. यामध्ये छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांचा देखील समावेश आहे परंतु त्यांच्यापेक्षा ट्विटरवर प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव जास्त ट्रेडिंगला आहेत.
काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आपली बहीण प्रियंका हिला पाठिंबा देण्यासाठी लागोपाठ ट्विट केले आहेत. “प्रियांका, मला माहिती आहे तू घाबरणार नाहीस. देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण लढा देत आहोत. त्यात तू पुढे येशील आणि आपणच विजयी होऊ, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. एकीकडे विरोधकांचा असा भडीमार होत असताना उत्तर प्रदेशातल्या योगी आदित्यनाथ सरकारच्या समर्थकांनी देखील #योगी जी लठ बजाव हा हँशटँग ट्विटरवर ट्रेंड करून आपणही राजकारणात मागे नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. लखीमपूर खीरीच्या घटनेवरून विरोधकांनी योगी आदित्यनाथ सरकारला घेरण्याचा प्रयत्न केल्याचा प्रतिकार #योगी जी लठ बजाओ या ट्रेंडमधून करण्यात येत आहे.
या खेरीज आज पुन्हा एकदा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देखील ट्विटरवर ट्रेंडमध्ये आहे. #एसआरके का लडका नशेडी हा हँशटँग काल ट्रेंडिगमध्ये आला होता. आज आर्यन खान ट्रेडिंगला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App