विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – त्रिपुरा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष पीयूष कांती बिस्वास यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. बिस्वास यांनी ट्विटद्वारे कॉंग्रेस राजीनामा देत असल्याची माहिती जाहीर केली आहे. आपल्या व्यक्तिगत कारणामुळे राजकारणापासून दूर जात असल्याचे सांगत कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. Tripura congress leader resigned
बिस्वास यांच्याकडे २०१९ मध्ये प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी आली होती. तत्कालीन अध्यक्ष प्रद्योत देववर्मा यांचे पक्षनेतृत्वाशी मतभेद झाल्यानंतर ते कॉंग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यावेळी बिस्वास यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात आले. आता स्थानिक कॉंग्रेस नेत्यांकडून सहकार्य मिळत नसल्याचे सांगत त्यांनीही पक्ष सोडला आहे.
बिस्वास यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की मी पक्षाचा राजीनामा देण्याबरोबरच राजकारणातूनही निवृत्ती घेत आहे. मला कॉंग्रेस नेतृत्वाकडून पाठबळ मिळाले. परंतु त्रिपुरा कॉंग्रेसमधील नेत्यांकडून अपेक्षित पाठबळ आणि सहकार्य लाभले नाही.
कॉंग्रेसला बळकट करण्यासाठी एकता आणि सहकार्य हवे होते, ते मिळाले नाही. मला कुणालाही दोष द्यायचा नाही. त्यामुळे मी राजीनामा देत आहे, असे सांगताना आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, ते तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App