विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळाल्यावर आता ममता बॅनर्जी यांना देशाच्या सत्तेची स्वप्ने पडू लागली आहेत. यासाठी २१ जुलै रोजी तृणमूल कॉँग्रेसच्या वतीने आॅनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मार्गदर्शन करणार आहेत. ‘मोदी भारत चोर’ अशी घोषणा तृणमूल कॉँग्रेस देणार आहे.Trinamool Congress dreams of power at Center, will enter national politics, ModiBharat Chor slogan
तृणमूल कॉंग्रेसचे नेते मदन मित्रा य् म्हणाले की 2024 मध्ये तृणमूल कॉँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच दिल्लीत पुढचे सरकार स्थापन करतील. उत्तर प्रदेशातील २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉँग्रेस निर्णायक ठरणार आहेत.
देशातील सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या या राज्यात भारतीय जनता पक्षाला उखडून टाकण्यात येणार आहेत. २१ जुलैला त्रिपुरा, आसाम, ओडिशा, बिहार, पंजाब, यूपी आणि दिल्ली येथे मोठ्या पडद्यांवर हा कार्यक्रम दिसणार आहे.
मित्रा म्हणाले की, मुख्य कार्यक्रम दिल्ली येथे कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे होईल. ममतर बॅनर्जी कोलकात्यातून मेळाव्याला संबोधित करतील. २१ जुलैला तृणमूल कॉँग्रेस शहीददिन म्हणून साजरा करतो. त्यासाठी सर्व विरोध पक्षांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
दिल्ली चलोच्या दिशेने एक पाऊल असेल. आम्ही पुन्हा बंगाल जिंकला आणि राज्याबाहेरील लोकांनी हे पाहिले आहे की, बॅनर्जी हे एकमेव अशी व्यक्ती आहेत जी भाजपाला तोंड देऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
कोलकत्ता येथे १९९३ मध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली युवक कॉँग्रेसने काढलेल्या मोर्चावर तत्कालिन डाव्या आघाडीच्या सरकारने गोळीबार केला होता. त्यामध्ये १३ जणांना प्राण गमवावे लागले होते. हा दिवस तृणमूल कॉँग्रेसकडून शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App