भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ सोमवारी राज्यसभेचे कामकाज तासभरासाठी तहकूब करण्यात आले. सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सभागृहात शोकसंदेश वाचून दाखवला. शोकसंदेश वाचून कामकाज तासभरासाठी तहकूब करण्यात आले. लोकसभेतही अध्यक्ष ओम बिर्ला यांचा शोकसंदेश वाचून झाल्यानंतर लोकसभेचे कामकाज तासभरासाठी तहकूब करण्यात आले. Tribute to Lataji Rajya Sabha session adjourned for an hour, PM to reply to discussion on motion of thanks
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ सोमवारी राज्यसभेचे कामकाज तासभरासाठी तहकूब करण्यात आले. सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सभागृहात शोकसंदेश वाचून दाखवला. शोकसंदेश वाचून कामकाज तासभरासाठी तहकूब करण्यात आले. लोकसभेतही अध्यक्ष ओम बिर्ला यांचा शोकसंदेश वाचून झाल्यानंतर लोकसभेचे कामकाज तासभरासाठी तहकूब करण्यात आले.
लता मंगेशकर यांचे रविवारी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्कवर पोहोचले होते. केंद्र सरकारनेही 6 आणि 7 फेब्रुवारीला राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे.
लताजींच्या निधनाबद्दल दोन दिवसांचा राष्ट्रीय शोक असेल. म्हणजेच देशभरात ध्वज अर्धवट राहील आणि कोणत्याही प्रकारचा उत्सवाचा कार्यक्रम होणार नाही. महाराष्ट्र सरकारने लताजींच्या स्मरणार्थ सोमवारी सार्वजनिक सुट्टी आणि तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. पश्चिम बंगाल सरकारने सोमवारी अर्धा दिवस सुटी जाहीर केली आहे.
८ जानेवारीला लताजींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोन दिवसांनंतर म्हणजेच १० जानेवारीला सर्वांना याची माहिती मिळाली. पाच दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती सुधारू लागली होती. पण आयसीयूमध्येच ठेवण्यात आले होते. रविवारी सकाळी 8.12 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत आणि मंगळवारी राज्यसभेत चर्चेला उत्तर देणार आहेत. उत्तर प्रदेशातील हापूरमधील पिलखुआ भागात AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सभागृहात उत्तर देणार आहेत. राज्यसभेत सकाळी 11:10 वाजता, तर लोकसभेत दुपारी 4:10 वाजता गृहमंत्री आपली बाजू मांडतील.
यावेळी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यांत चालणार आहे. पहिला टप्पा 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी आणि दुसरा टप्पा 14 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. संसदीय कामकाजाच्या केंद्रीय समितीने याची शिफारस केली होती. दोन्ही सभागृहांची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने झाली आहे. 12 फेब्रुवारीपासून एक महिन्याची सुटी असेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App