तेथे कर माझे जुळती : लतादीदींच्या दर्शनासाठी पहाटेपासून शिवतीर्थावर चाहत्यांची वर्दळ


प्रतिनिधी

मुंबई : भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पार्थिव देहावर रविवारी, ६ फेब्रुवारी रोजी शिवतीर्थावर येथे मंत्राग्नी देण्यात आला. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गर्दीमुळे चाहत्यांना लतादीदींचे दर्शन घेता आले नाही. लांबून दर्शन घेणाऱ्या या स्वर सरस्वतीचे दर्शन घेण्यासाठी सोमवारी, ७ फेब्रुवारी पहाटेपासूनच चाहत्यांचे पाय शिवाजी पार्ककडे वळत होते आणि चितेकडे पाहून दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती अशा भावनेतून हात जोडून नमस्कार करत होते. Fans throng Shivtirtha from early morning to pay homage to latadidi

लतादीदींच्या पार्थिव देहावर रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी हजारो चाहते वर्ग शिवाजी पार्कात जमला होता. पेडर रोड ते शिवाजी पार्क लष्कराच्या ट्रॅक फुलांनी सजवून पार्थिव शिवाजी पार्कात आणण्यात आले होते.

Lata Mangeshkar : कोल्हापुरातील याच घरात गेलं लतादीदींचं बालपण, मंगेशकर कुटुंबीय १० वर्षे राहिले

लतादीदींचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी मुखाग्नी दिला आणि सगळ्या चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आले. सोमवारी पहाटेपासून शिवाजी पार्कात चाहत्यांची दर्शनासाठी वर्दळ सुरू झाली. यात मॉर्निंग वॉकसाठी येणारेही आवर्जून चितेकडे येऊन हात जोडून दर्शन घेताना दिसत होते.

हृदयनाथ मंगेशकर यांचे चिरंजीव आदिनाथ मंगेशकर यांनी सकाळी १०.३० वाजता शिवाजी पार्क येथे येऊन अस्थी घेऊन प्रभूकुंज येथे घेऊन गेले.

Fans throng Shivtirtha from early morning to pay homage to latadidi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात