कोरोना लसीकरणात आदिवासी जिल्हे शहरांच्याही पुढे

देशात कोरोना लसीकरणाबाबत सुशिक्षित शहरी नागरिकांच्या मनात संभ्रम असताना आदिवासी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना लसीकरणाच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा १२८ जिल्ह्यांची लसीकरण सरासरी जास्त आहे. विशेष म्हणजे आदिवासी स्वत: येऊन कोरोना लसीकरण करून घेत आहेत.Tribal districts are ahead of cities in corona vaccination


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरणाबाबत सुशिक्षित शहरी नागरिकांच्या मनात संभ्रम असताना आदिवासी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना लसीकरणाच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा १२८ जिल्ह्यांची लसीकरण सरासरी जास्त आहे.विशेष म्हणजे आदिवासी स्वत: येऊन कोरोना लसीकरण करून घेत आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील १७६ पैकी १२८ जिल्ह्यांत राष्ट्रीय सरासरीपेक्षाही जास्त लसीकरण झाले आहे. कोेविन अ‍ॅपवर उपलब्ध असलेल्य आकडेवारीनुसार महिलांच्या लसीकरणाचे प्रमाणही आदिवासी जिल्ह्यांत चांगले आहे.आदिवासी जिल्ह्यात दर दहा लाख नागरिकांमागे लसीकरणाचे प्रमाण १,७३,८७५ आहे. राष्ट्रीयपातळीवर हेच प्रमाण १,६८, ९५१ आहे.सरकारच्या म्हणण्यानुसार, आदिवासी स्वत:हून पुढे येत लसीकरण करून घेत आहेत. थेट लसीकरण केंद्रावर येऊन लस घेण्याचे राष्ट्रीय प्रमाण ८१.१९ आहे. मात्र, आदिवासी जिल्ह्यात हेच प्रमाण ८८.१२ इतके आहे.

लसीकरणात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ग्रामीण-शहरी असा भेद केला जात आहे. शहरांमध्ये जादा प्रमाणात लसी पुरविल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, या आकडेवाारीने हा आरोप फोल ठरला आहे. देशातील ६९,९९५ लसीकरण केंद्रांपैकी ७१ टक्के म्हणजे ४९,८८३ केंद्रे ग्रामीण भागात आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणीकरणे बंधनकारक नाही. तसेच अगोदर अपॉइंटमेंट घेण्याचीही गरज नाही. कोणीही अठरा वर्षांवरील व्यक्ती थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतो. केंद्रावरच जाऊन नोंदणी करून लस घेणे शक्य आहे.कोविन अ‍ॅपवरील नोंदणी ही केवळ एक सुविधा आहे.

आरोग्य कर्मचारी किंवा आशा वर्कर लाभार्थ्यांना गोळा करून त्यांचे जवळच्या केंद्रावर लसीकरण करू शकतात. १०७५ या हेल्पलाईनवरही लसीकरणाची नोंद करून लस घेणे शक्य आहे. १३ जूनपर्यंत देशातील २८.३६ कोटी लोकांनी कोविन अ‍ॅपवर नोंदणी केली होती. त्यातील ५८ टक्के १६,४५ कोटी नागरिकांनी थेट केंद्रावर जाऊन नोंदणी केली होती, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

Tribal districts are ahead of cities in corona vaccination

महत्त्वाच्या बातम्या