पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी भागातील मैंगुडी येथे बिकानेर एक्सप्रेस (१५६३३) रुळावरून घसरली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. मालगाडीचे चार ते पाच डबे रुळावरून घसरले. ही ट्रेन बिकानेरहून गुवाहाटीला जात होती.Train Accident: Train going from Bikaner to Guwahati derails, coaches run over each other, many injured
वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी भागातील मैंगुडी येथे बिकानेर एक्सप्रेस (१५६३३) रुळावरून घसरली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. मालगाडीचे चार ते पाच डबे रुळावरून घसरले. ही ट्रेन बिकानेरहून गुवाहाटीला जात होती.
दरम्यान, मैनागुरी ओलांडत असताना हा अपघात झाला. माहिती मिळताच रेल्वे पोलिस प्रशासनासह जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केले. अपघातातील जखमींना रेल्वेच्या बोगीतून बाहेर काढल्यानंतर स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात येत आहे.
#UPDATE | Guwahati-Bikaner Express 15633 (up) derailed at about 5 pm this evening. 12 coaches have been affected. DRM and ADRM rushed to the site along with accident relief train and medical van: Indian Railways — ANI (@ANI) January 13, 2022
#UPDATE | Guwahati-Bikaner Express 15633 (up) derailed at about 5 pm this evening. 12 coaches have been affected. DRM and ADRM rushed to the site along with accident relief train and medical van: Indian Railways
— ANI (@ANI) January 13, 2022
ही घटना गुरुवारी सायंकाळी 5.15 च्या सुमारास घडली. ट्रेनचे 12 बोगी रुळावरून घसरले असून प्रवाशांनी भरलेले 4 डबे पूर्णपणे उलटले आहेत. यातील एक डबाही पाण्यात उतरला असून, त्यातून अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यात येत आहे.
जवळपासच्या कोणत्याही स्टेशनवर थांबा नव्हता आणि ट्रेन त्या भागातून जात होती. एनडीआरएफसह स्थानिक बचाव कार्य पथके घटनास्थळी आहेत. या दुर्घटनेसाठी जारी केलेला हेल्पलाइन क्रमांक- 8134054999 असा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App