पाकिस्तानशी व्यापार चर्चा; पंजाब काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मतभेद; नवज्योत सिद्धू – मनीष तिवारी आमने-सामने


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानशी ताबडतोब व्यापार चर्चा सुरू करावी, अशी आग्रही भूमिका पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिद्धू यांनी मांडली आहे. त्यालाच काँग्रेसचे पंजाब मधले खासदार मनीष तिवारी यांनी छेद दिला आहे. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादी कारवाया थांबत नाही तोपर्यंत या देशाशी व्यापारी चर्चा करण्यात काही अर्थ नाही, असे वक्तव्य मनीष तिवारी यांनी केले आहे. Trade talks with Pakistan; congress men navjoyt siddhu – manish tiwari cross each other

नवज्योत सिंग सिद्धू हे पहिल्यापासूनच पाकिस्तान समर्थक राहिले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्या व्यापाऱ्याचे पोटेन्शियल 35 हजार कोटी डॉलर्सचे आहे. गेल्या काही वर्षांपासून घटून ते 3000 डॉलरपर्यंत खाली आले आहे. यामुळे पंजाबचे नुकसान होते. पंजाब प्रांतांमध्ये युवकांना या निर्यातीच्या व्यवसायातून जो मोठा रोजगार उपलब्ध होऊ शकतो, तो सध्या मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने ताबडतोब पाकिस्तानशी व्यापार चर्चा सुरू करून व्यापार वाढवण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी नवज्योतसिंग सिद्धू यांनी केली आहे. मध्यंतरी करतारपुर कॉरिडोर मध्ये भेट दिल्यानंतर देखील त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन हीच मागणी केली होती.परंतु नवज्योत सिंग सिद्धू यांच्या याच मागणीला काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी विरोध केला आहे. पाकिस्तानने भारतात दहशतवादी पाठवायचे. ड्रोन मधून हत्यारे, ड्रग्ज पाठवायचे आणि आपण त्यांच्याशी व्यापारी चर्चा करायची हे अजिबात योग्य नाही. हे कोणत्याही परराष्ट्र नीतीत बसत नाही, असा टोला मनीष तिवारी यांनी लगावला आहे.

केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर धोरण अवलंबले असताना पाकिस्तानशी व्यापार चर्चा करण्यावरून काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये वाद जुंपलेल्याने काँग्रेसचे पाकिस्तान विषयक नेमके धोरण काय आहे?, यावरच ठळक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Trade talks with Pakistan; congress men navjoyt siddhu – manish tiwari cross each other

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण