राज्याला एकूण ८४ पोलीस पदक : उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला तीन ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन


 

प्रतिनिधी

नवी दिल्ली/ मुंबई : पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 84 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील 3 पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 42 पोलीस शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेकरिता 39 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. Total 84 Police Medals for the State Three ‘President’s Police Medals’ for Maharashtra for outstanding service, Chief Minister felicitated

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी एकूण 1082 पोलीस पदक जाहीर झाली असून 87 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम), 347 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 648 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण ८४ पदक मिळाली आहेत.

‘कर्तव्यदक्ष भावनेने बजावलेली सेवा ही सर्वात मोठी देशसेवा आहे. त्यासाठी आपल्याला राष्ट्रीय स्तरावरील सन्मानदर्शक पदक जाहीर होणे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पोलीस पदक, अग्निशमन सेवा, गृह व नागरी सेवा पदक पटकावणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने आज या पदक, सेवा पुरस्कारांची घोषणा केली. त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील ४२ जणांना पोलीस शौर्य पदक, तर तिघांना उल्लेखनीय कामगिरीसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि ३९ जणांना गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे. याशिवाय महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील ७ अधिकारी, कर्मचारी यांना अग्निशमन पदक जाहीर झाले आहे.तसेच गृहरक्षक दलातील एकाला गुणवत्तापूर्ण सेवेसाठी नागरी संरक्षण पदक जाहीर झाले आहे. गुन्ह्यांच्या उत्कृष्ट तपास कामासाठी राज्यातील ११ अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. या सर्वच अधिकारी, कर्मचारी यांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदन केले असून, या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

देशातील 87 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना

उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे….

‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम)

 

1. श्री सुनिल कोल्हे, सह आयुक्त ,राज्य अन्वेषण विभाग, पोलीस मुख्यालय, कुलाबा, मुंबई.

2. श्री प्रदीप कन्नाळू, सहायक पोलीस आयुक्त, (वायरलेस), ठाणे शहर.

3. श्री. मनोहर धनावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ओसीवाडा पोलीस स्थानक, मुंबई शहर.

 

राज्यातील एकूण ४२ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’

 

१. श्री. मनीष कलवानिया, भापोसे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक

२. श्री. समीर शेख, अतिरीक्त पोलीस अधीक्षक

३. श्री भाऊसाहेब ढोले , उप पोलीस अधीक्षक

४. श्री महारुद्र परजाणे , सहायक पोलीस निरीक्षक

५. श्री. राजरत्न खैरनार, सहायक पोलीस निरीक्षक

६. श्री. राजू कांडो , पोलीस नाईक

७. श्री. अविनाश कुमरे, पोलीस कॉन्स्टेबल

८. श्री. गोगलु टिम्मा , पोलीस कॉन्स्टेबल

९. श्री. संदीप भांड, सहायक पोलीस निरीक्षक

१०. श्री. मोतीराम मडावी , सहायक पोलीस उपनिरीक्षक

११. श्री. दामोधर चिंतुरी , नाईक पोलीस कॉन्स्टेबल

१२. श्री. राजकुमार भडावी ,नाईक् पोलीस कॉन्स्टेबल

१३. श्री. सागर मुल्लेवार, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

१४. श्री. शंकर मडावी , नाईक पोलीस कॉन्स्टेबल

१५. श्री. रमेश असाम , नाईक पोलीस कॉन्स्टेबल

१६. श्री. महेश सयाम , पोलीस कॉन्स्टेबल

१७. श्री. साईकृपा मिरकुटे, पोलीस कॉन्स्टेबल

१८. श्री. रत्नय्या गोरगुंडा, पोलीस कॉन्स्टेबल

१९. श्री. संदीप मंडलिक, सहायक पोलीस निरीक्षक

२०. श्री. मोतीराम मडावी, पोलीस उपनिरीक्षक

२१. श्री. दयानंद महाडेश्वर, पोलीस उपनिरीक्षक

२२. श्री. जीवन उसेंडी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

२३. श्री. राजेंद्र मडावी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

२४. श्री. विलास पाडा, पोलीस कॉन्स्टेबल

२५. श्री. मनोज इस्कापे, पोलीस कॉन्स्टेबल

२६. श्री. मनोज गज्जमवार, पोलीस नाईक

२७. श्री. अशोक माज्जी, पोलीस कॉन्स्टेबल

२८. श्री. देवेंद्र पाखमोडे, पोलीस कॉन्स्टेबल

२९. श्री. हर्षल जाधव, पोलीस उपनिरीक्षक

३०. श्री. जगदेव मडावी (मरणोत्तर),हेड कॉन्स्टेबल

३१. श्री. सेवकराम मडावी , हेड कॉन्स्टेबल

३२. श्री. सुभाष गोंगाळे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

३३. श्री. रोहीत गोंगाळे, पोलीस कॉन्स्टेबल

३४. श्री. योगीराज जाधव, पोलीस उपनिरीक्षक

३५. श्री. धनाजी होणमाने , पोलीस उपनिरीक्षक

३६. श्री. दसारु कुरसामी, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

३७. श्री. दीपक विडपी, पोलीस कॉन्स्टेबल

३८. श्री. सुरज गंजीवार, पोलीस कॉन्स्टेबल

३९. श्री. किशोर अत्राम, पोलीस कॉन्स्टेबल

४०. श्री. गजानन अत्राम, पोलीस कॉन्स्टेबल

४१. श्री. योगेश्वर सडमेक, पोलीस कॉन्स्टेबल

४२. श्री. अंकुश खंडारे, पोलीस कॉन्स्टेबल

 

राज्यातील एकूण ३९ पोलिसांना ‘पोलीस पदक’

 

१. श्री सुभाष निकम, उप पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेघण विभाग, औरंगाबाद

२. श्री आप्पासाहेब शेवाळे , उप पोलीस अधीक्षक , पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा

३. श्री संतोष जोशी , पोलीस निरीक्षक ,वायरलेस, पोलीस आयुक्त कार्यालय औरंगाबाद

४. श्री भानुदास खटावकर, पोलीस निरीक्षक, पोलीस कल्याण विभाग, नवी मुंबई

५. श्री अशोक भगत , पोलीस निरीक्षक, गुन्हे विभाग, ठाणे

६. श्री. नितीन पोतदार, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, क्रॉफॉर्ड मार्केट मुंबई

७. श्री. व्यंकट केंद्रे, पोलीस निरीक्षक, जिन्सी पोलीस स्थानक, औरंगाबाद शहर

८. श्री दीलीप तवरे, सहायक कमांडंट,आय.आर.बी.आय.,जी.आर.-१४,औरंगाबाद

९. श्री. श्रीकांत अदाते, पोलीस निरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, मारोळ, मुंबई

१०. श्री. राजेंद्र कोळी, सहायक पोलीस निरीक्षक, फोर्स१, एसआरपीएफ कँप, गोरेगांव मुंबई

११. श्री. सुनिल कुवेसकर, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस नियंत्रण कक्ष, भायखडा, मुंबई

१२. श्री. शंकर गांवकर, पोलीस उपनिरीक्षक, मुंबई सागरी १ पोलीस स्थानक, माहीम मुंबई

१३. श्री देवीदास बंड, आर्मड पोलीस सब इनस्पेक्टर,आयआरबी२,बीआयआरएसआय कँप.गोंदिया

१४. श्री क्रिष्णा हिसवणकर, पोलीस उपनिरीक्षक,उप विभागीय पोलीस कार्यालय,उस्मानाबाद

१५. श्री. प्रदीप चांदेलकर, पोलीस उपनिरीक्षक, जिल्हापेठ पोलीस स्थानक, जळगाव

१६. श्री. वाल्मीक मंढारे, पोलीस उपनिरीक्षक, कापुरबावडी पोलीस स्थानक, ठाणे शहर

१७. श्री. सुनिल अंबराते, पोलीस उपनिरीक्षक, कन्हाण पोलीस स्थानक , नागपूर ग्रामीण

१८. श्री माणीक गाईकर, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा,नाईक शहर

१९. श्री. जमीलुदृीन जागीरदार,पोलीस उपनिरीक्षक, उप जिल्हा पोलीस कार्यालय,सेलु, परभणी

२०. श्री विलास जामनेकर,पोलीस उपनिरीक्षक, रिडर शाखा, विभागीय पोलीस आयुक्त (डीसीपी)

झोन २, अमरावती शहर

२१. श्री. अविनाश अक्कावार, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नागपूर शहर

२२. श्री. जितेंद्र मोहिते, सहायक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, मुंबई शहर

२३. श्री. माणीक सपकाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, जळगाव, तालुक्का पोलीस स्थानक, जळगाव

२४. श्री. विजय गेडाम, सहायक पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग सुरक्षा पोलीस , चंद्रपूर

२५. श्री. प्रमोद ढोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली

२६. श्री. प्रवीण बेझालवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक,पोलीस अधीक्षक ,गडचिरोली

२७. श्री गुलाम मेहबुब गुलाम हैदर गलेकाटू, सहायक पोलीस उपनिरीक्षक, दशतवाद विरोधी सेल, लातूर

२८. श्री. धनराज टाळेकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक, बोरीवली पोलीस स्थानक, मुंबई शहर

२९. श्री. अशोक राणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक ,गेन्हे शाखा, ठाणे शहर

३०. श्री. संतोष वाजुरकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक, रिडर शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय बीड

३१. श्री. भास्कर वानखेडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, रिडर शाखा,बुलडाणा

३२. श्री. प्रदीप चिरमाडे, चालक, सहायक पोलीस उपनिरीक्षक, मोटर ट्रान्सपोर्ट विभाग,जळगाव

३३. श्री. सुरेश कदम , सहायक पोलीस उपनिरीक्षक, दशतवाद विरोधी पथक, विक्रोळी युनीट,मुंबई

३४. श्री. विजय पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक, जळगाव तालुका पोलीस स्थानक,जळगाव

३५. श्री. सुनिल गीत, सहायक पोलीस उपनिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक

३६. श्री. राजेंद्र शिर्के, हेड कॉन्स्टेबल , रायटर/२४२१३,गुन्हे शाखा,युनाईट ९,वांद्रे, मुंबई

३७. श्री. सुरेश पाटील, हेड कॉन्स्टेबल/१६६, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव

३८. श्री. अशोक भोंडवे, गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई

३९. श्री. सुर्यकांत अनांडे, पोलीस उपनिरीक्षक, उप जिल्हा पोलीस कार्यालय, उस्मानाबाद

Total 84 Police Medals for the State Three ‘President’s Police Medals’ for Maharashtra for outstanding service, Chief Minister felicitated

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती