वृत्तसंस्था
टोकियो : टेबल टेनिसपटू भाविनाबेन पटेलने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक आणले आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भाविनाने संपूर्ण भारताला ही भेट दिली आहे. भारताच्या भाविनाबेन पटेलने टोकियो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास ४ स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. भारताचे हे पहिले पदक ठरले आहे. Tokyo Paralympics Bhavina Patel Win Silver Medal
अंतिम फेरीत भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगशी झाला. यिंगने जेतेपदाच्या लढतीत भाविनाबेनचा ३-० असा पराभव केला. टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली खेळाडू ठरली आहे. पराभव होऊनही भाविनाने खेळाने क्रीडा रसिकांची मने जिंकली आहेत. भारताच्या भाविनाबेन पटेलने उपांत्य फेरीत चीनच्या मियाओ झांगचा ३-२ असा पराभव केला होता.
३४ वर्षीय भाविनाबेनने शनिवारी क्लास ४च्या उपांत्य फेरीत चीनच्या मियाओ झांगचा ३-२ असा पराभव केला होता. भाविनाने भारतीय शिबिरातील सर्वांना चकित केले. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ७-११, ११-७, ११-४, ९-११, ११-८ ने पराभूत केले होते.
गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात लहान किराणा दुकान चालवणाऱ्या हसमुखभाई पटेल यांची मुलगी असलेली भाविना सुवर्णपदकाची दावेदार मानली जात होती.पण अंतिम फेरी रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. भाविनाच्या या उत्कृष्ट कामगिरीने कामगिरीने इतिहास रचला आहे. उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भाविनाने ब्राझिलच्या जॉयसे डी ऑलिव्हेराचा १२-१०, १३-११, ११-६ असा २३ मिनिटांत पराभव केला. गटसाखळीमधील दोन्ही सामने गमावल्यामुळे गुरुवारी सोनल पटेलचे आव्हान संपुष्टात आले होते. त्यामुळे टेबल टेनिसमध्ये एकमेव भाविनाचे आव्हान टिकून होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App