Tokyo Olympics : भलाफेकीत भारताला पदकाची आशा : नीरज चोप्राने केली सर्वोत्तम कामगिरी ; अंतिम फेरीत दाखल


८६.६५ मी. लांब भाला फेकत मिळवलं अंतिम फेरीचं तिकीट


२३ वर्षीय नीरज चोप्राने याआधी झालेल्या किमान १० आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला पदक मिळवून दिलं आहे


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये Athletics प्रकारात भारताला आणखी एक पदक मिळू शकते . भालाफेक प्रकारात भारताचा युवा खेळाडू नीरज चोप्राने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अ गटात खेळत असताना नीरज चोप्राने ८६.६५ मी. लांब भाला फेकत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. एकूण ३२ स्पर्धकांपैकी १६ स्पर्धकांना दोन-दोन गटात विभागण्यात आलं होतं. Tokyo Olympics: India hopes for a medal in the Javelin throw : Neeraj Chopra’s best performance



अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी ८३.५० मी. चा निकष ठेवण्यात आला होता. नीरज चोप्राने हा निकष पूर्ण करत भारताला आणखी एका पदकाची आशा दिली आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्येही नीरज भारताला पदकाची कमाई नक्कीच करुन देईल.

नीरज चोप्राने आज केलेली कामगिरी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे. २०१७ सालच्या वर्ल्ड चॅम्पिअनशीप स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जर्मनीच्या जोहान्स वेटेरला नीरज चोप्राने मागे टाकलं.

ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी नीरज चोप्रा गेल्या काही वर्षांपासून तयारी करत होता. दरम्यान एकीकडे नीरज चोप्राने अंतिम फेरीत प्रवेश करुन भारताला पदकाची आशा दिली असली तरीही भारताचा आणखी एक खेळडू शिवपाल सिंग भालाफेकीत पात्रता फेरीतूनच बाहेर पडला आहे. त्यामुळे आता नीरज चोप्राचा भाला अंतिम फेरीत सुवर्णपदकाचा वेध घेणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Tokyo Olympics : India hopes for a medal in the Javelin throw : Neeraj Chopra’s best performance

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात