Tokyo Olympic 2020;ऑलिम्पिकमध्ये भारताचे दुसरे पदक निश्चित; बॉक्सर लव्हलिनाची उपांत्य फेरीत धडक


वृत्तसंस्था

टोकियो : भारताची युवा बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने चीनच्या चेन निन चेनशीवर ४-१ ने मात करत ऑलिम्पिकमध्ये  भारताचे दुसरे पदक निश्चित केले आहे. Tokyo olympic 2020; Boxer Lovelina Win Semifinals. India’s Second Medal In The Olympics Is Certain

बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने दोन दिवसांपूर्वी कारकीर्दीतील पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची किमया साधली होती. शुक्रवारी महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील रोमहर्षक उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत लव्हलिनाने चायनीज तैपईची माजी जगज्जेती निन-चीनवर सरशी साधत मात केली आहे. लव्हलिनाने निन-चीनवर ४-१ ने मात करत ऑलिम्पिकमध्ये भारताचे पदक निश्चित केले आहे.



बॉक्सिंगमध्ये उपांत्य फेरी गाठली की पदकाची खात्री होते. लव्हलिनाची उपांत्य फेरीत २०१९ च्या विश्वविजेत्या टर्कीच्या अ‍ॅना लिसेन्कोशी लढत होईल.

लव्हलिना ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी भारताची दुसरी भारतीय महिला बॉक्सर बनली आहे. त्याच्या आधी मेरी कोमने लंडन ऑलिम्पिकमध्ये २०१२ मध्ये कांस्यपदक जिंकले होते. बॉक्सिंगमध्ये पुरुष आणि महिला दोघांमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी लव्हलिना तिसरी भारतीय आहे. पुरुषांमध्ये विजेंदर सिंगने २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

Tokyo olympic 2020; Boxer Lovelina Win Semifinals. India’s Second Medal In The Olympics Is Certain

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात