भाजपच्या मागे काँग्रेसची फरफट; पसमांदा मुस्लिमांना पटवण्याची मशक्कत!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी काँग्रेसचे नेते वाटेल ते करायला तयार झाले आहेत. मग त्यासाठी भाजपच्या मागे काँग्रेसची फरफट झाली तरी त्यांना चालणार आहे. कारण काँग्रेसने आता भाजप पाठोपाठ पसमांदा मुस्लिमांना पटवण्यासाठी राजकीय मशक्कत सुरू केली आहे. To avert polarisation, Cong to reach out to minorities and Pasmanda Muslims for mission 2024

काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलने मुस्लिमांना मागास समूदाय पसमांदांसह वेगवेगळ्या अल्पसंख्यांक समुदायांना काँग्रेसच्या बाजूने वळविण्यासाठी एक रोड मॅप तयार केला आहे. त्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा पुढचा भाग म्हणून भारत जोडो भाईचारा संमेलने घेण्याचे पक्षाने निश्चित केले आहे. त्यासाठी काँग्रेसने प्रामुख्याने पसमांदा मुस्लिमांची निवड केली आहे. बाकीचे ख्रिश्चन जैन शीख हे अल्पसंख्यांक समुदाय देखील त्यात आहेत. लवकरच दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर भाईचारा संमेलन होणार आहे.



पण हीच नेमकी काँग्रेसची भाजप मागे फरफट आहे. कारण भाजपने काँग्रेसची मुस्लिम मतपेढी लक्षात घेऊन नवीन स्ट्रॅटेजी आखत देशातल्या 64 मतदारसंघांना विशेषत्वाने टार्गेट केले आहे, ज्यामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या 20 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या मतदारसंघांमध्ये भाजपचे आधीपासूनच मोठे कॅम्पेन सुरू झाले आहे. तिथे भाजप विशेष सरकारी उपक्रमांद्वारे पोहोचत आहे. त्यात यश येत आहे हे पाहून आता काँग्रेस नेत्यांना जाग आली आहे.

काँग्रेसने 100 मतदारसंघांमध्ये अल्पसंख्यांक समुदायांसाठी वेगवेगळे उपक्रम घेण्याचा निर्णय घेतला आहे. याची जबाबदारी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचे प्रमुख आणि महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवलेले खासदार इमरान प्रतापगडी यांच्यावर सोपवली आहे. भाजप गेल्या काही महिन्यांपासून 64 मतदारसंघांमध्ये वेगवेगळे उपक्रम घेत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसत असल्यामुळे काँग्रेस अधिक सावध झाली आहे आणि त्यातूनच भारत जोडो भाईचारा संमेलना सारखी राजकीय संकल्पना पक्षाने बाहेर काढली आहे. ही खऱ्या अर्थाने भाजपच्या पाठीमागे काँग्रेसची फरफट आहे.

वास्तविक कर्नाटक मधल्या निवडणुकीत जेडीएसची मुस्लिम मते खेचूनच काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे त्यासाठी पक्षाला तिथे कोणती भाईचारा संमेलने घ्यावी लागलेली नाहीत.

शिवाय काँग्रेसने आतापर्यंत हिंदुत्व विरुद्ध अल्पसंख्यांक कार्ड खेळले असले तरी त्यांनी कधी पसमांदा मुस्लिम वगैरे कोणतेही कार्ड खेळलेले नाही. पण भाजप एकीकडे हिंदुत्वाचे कार्ड खेळताना दुसरीकडे पसमांदा मुस्लिम समुदायासाठी विशेष उपक्रम घेत असेल, तर आपणही मागे राहून चालणार नाही याची जाणीव काँग्रेस नेतृत्वाला झाल्यानंतर पसमांदा मुस्लिमांसह अल्पसंख्यांकांसाठी उपक्रमाचा रोड मॅप पक्षाने तयार केला आहे. आता तो कसा राबवतात आणि त्यातून काँग्रेसला किती यश येते हे 2024 ची निवडणूक ठरवणार आहे.

To avert polarisation, Cong to reach out to minorities and Pasmanda Muslims for mission 2024

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात