उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चार दिवसांत मला पकडून दाखवा, असे आव्हानही धमकी देणाऱ्याने दिले आहे.Threats to kill Yogi Adityanath
विशेष प्रतिनिधी
लखनऊ: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चार दिवसांत मला पकडून दाखवा, असे आव्हानही धमकी देणाऱ्याने दिले आहे.
उत्तर प्रदेशातील ११२ क्रमांकाच्या कंट्रोल रुमच्या व्हॉटसअॅप क्रमाकांवर मेसेज पाठवून योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा मेसेज मिळाल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यानी अलर्ट जारी केला आहे.
कंट्रोल रुमचे कमांडर अंजुल कुमार यांनी या प्रकरणी सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याचबरोबर पोलीसांचे अनेक पथके धमकी देणाºयाचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आली आहेत. त्याचबरोबर धमकी देणाऱ्याचे लोकेशनही शोधºयात येत आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास व्हॉटसअॅपवर एक मेसेज आला. यामध्ये पाच दिवसांत योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
चार दिवसांत माझे काय बिघडवायचे आहे ते बिघडवा, अशी धमकी त्याने दिली आहे.योगी आदित्यनाथ यांनी यापूर्वीही धमकी आली होती. गेल्या वर्षी मे, सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यात योगींना मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलीसांनी महाराष्ट्रातून एकाला अटक केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App